दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं. त्यानंतर मी माझ्या भाच्याबरोबर परतीसाठी मिरजेहून 12493 दर्शन एक्सप्रेसची निवड केली आणि आरक्षणही करून टाकलं.
मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे. या प्रवासावर आधारित गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली आहेत.
यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख. मुंबईत अनेकवेळा जाणं झालं असलं तरी भायखळ्याला जाऊन त्या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीला भेट देण्याची संधी अलिकडेच मिळाली होती.
दिवा जंक्शन ओलांडत असताना पनवेलकडून WAP-4 इंजिनासोबत एक समर स्पेशल बाहेर होम सिग्नलला थांबलेली होती. पुढच्या सहाच मिनिटांत राणी कल्याण ओलांडत होती. कल्याणमधून बाहेर पडून कर्जतच्या मार्गाला लागत असतानाच आधी तिकडून आलेली लोकल पलिकडच्या मार्गावरून कल्याणमध्ये आली आणि दीड मिनिटानीच तिच्या मागोमाग पुण्याहून तपकिरी रंगाच्या कल्याणच्या WCAM-2 बरोबर आलेली डेक्कन एक्स्प्रेस शेजारून क्रॉस झाली. या मोठ्या वळणावर पुढच्या सगळ्या डब्यांच्या दारात उभं राहून तसंच खिडक्यांमधून कॅमेरे, मोबाईल बाहेर काढून फोटो आणि व्हिडिओ करणारे Railfans दिसत होते.
भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवास करण्याचा सल्ला त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी तयार केल्या गेलेल्या खास डब्यांचा वापर डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या दौऱ्यासाठी केला जाऊ लागला. ब्रिटिश राजवटीच्या काळात तो डबा भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी एकोणिसाव्या शतकात तयार करण्यात आला होता.
सोलापुरात चालक आणि गार्ड बदलले गेले आणि सव्वानऊला शताब्दी पुढच्या प्रवासाला निघाली. कोरोना साथीच्या भितीमुळे सर्वांचाच प्रवास कमी झाला होता. त्यामुळे सोलापूरहून गुलबर्गा, हैदराबादला जाणारी गर्दी आज दिसत नव्हती. आमच्या डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती म्हणायची, पण पुढचा डबा तर पूर्ण मोकळाच होता. नाश्त्यानंतर तर बऱ्याच जणांनी मास्क उतरवलेच होते. दरम्यान, सोलापुरातून सुटत असतानाच होटगीकडून आलेली BOXN वाघिण्यांची मालगाडी शेजारच्या मार्गावर येऊन उभी राहिली होती.
पुणे आणि सिकंदराबाददरम्यान धावणारी शताब्दी एक्सप्रेस 20 मार्च 2020 पासून बंद आहे. या जुलैमध्ये देशात पुन्हा धावायला लागणाऱ्या गाड्यांच्या यादीत या शताब्दीचं नाव नाही. ही शताब्दी सुरू होण्याची वाट पाहून मीसुद्धा कंटाळलो आणि या शताब्दीनं मी केलेल्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो.