त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-२)
दरम्यान, सकाळचा चहा येऊन गेला होता आणि नाश्ता यायला अजून थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे गाडीत काहींच्या सहप्रवाशांबरोबर गप्पा चालू होत्या, काहींचे वर्तमानपत्राचे वाचन सुरू होते, तर काहींची डुलकी सुरू होती, तर काहींचे मोबाईलमध्ये डोळे घालून काही पाहणे सुरू होते. पुढे भिगवणमध्ये आत जाताना शताब्दी थोडी हळू धावू लागली. भिगवणनंतर पुढे अजून दुहेरी मार्ग सुरू झालेला नसल्यामुळे इथे नेहमीच डाऊन दिशेला जाताना गाडीचा वेग मंदावत असतो. त्यामुळे मला वाटलं की, हळूच गाडी पुढे जाईल आता, पण तितक्यात वेग आणखी कमी झाला आणि गाडी 3 मिनिटं भिगवणमध्ये फलाटावर विसावली.