सारं गतिमान झालंय हल्ली...
त्यामुळे तोल जातो माझा
भरधाव वेगानं कुणीतरी समोरून जातं...
आणि मग बाचकायला होतं!
'विसावा' घेणं म्हणजे,
पळण्याच्या शर्यतीत विसावा आल्याचं भासतं!
मग मी देखील पळतो...
अगदी ऊर फुटेस्तोवर, धावत सुटतो
विक-डेज ला गावं शहरांकडे पळतात...
अन विकेन्ड ला शहरं गावांकडे
मधे आहेत फक्त भरधाव धावणारे रस्ते...
अन त्यासाठी भरावे लागणारे टोल!
पडवीत आडवा होऊन, वाचायला घेतलेलं पुस्तक...
ते तसंच पडून आहे कधीचं
फडफडताहेत ती केवळ वाचलेली पानं...
न वाचलेलं तसंच, चहाच्या कपाखाली बंदीस्त
राम आत्माराम
उपवास पूर्ण । असो साधे अन्न ।
राम नामाविण । निरर्थक ।।
राहो गिरी, धामी । महाली आश्रमी ।
राम ते सप्रेमी । तरी सौख्य ।।
असो उपकारी । नेमस्त संसारी ।
रामाविण फेरी । चुकेचिना ।।
थोर नित्य कर्म । बहु दान धर्म ।
रामचि सुवर्म । तयामाजि ।।
रामनाम मुखी । जगी दोष देखी ।
रोगी सर्वार्थेसी । पथ्यहीन ।।
चित्ती राम जाण । तेणे समाधान ।
व्यर्थचि साधन । तयाविण ।।
राम आत्माराम । निश्चये स्वधर्म ।
प्रचिती सप्रेम । सद्गुरु योगे ।।
"न्यायाधीशांना दिवसभरात तुमची कधीही गरज भासू शकते त्यामुळे पाचवाजेपर्यंत थांबणं जरुरीचं आहे. इमारतीबाहेर फक्त जेवणासाठी जाता येईल. तुमची निवड झाली तर कदाचित एकाच दिवसात काम संपेल, कदाचित कितीतरी दिवस लागतील. काम सुरु व्हायच्याआधीच तुमच्या अडचणी तुम्ही न्यायाधीशांना सांगू शकता..." ज्युरीड्युटीसाठी आलेल्या साधनाला ते ऐकताना आता आठ ते पाच इतका वेळ बसून काय करायचं हा प्रश्न पडला, तसा तो तिथे असलेल्या १५ - २० जणांनाही पडलेला होताच. हळूहळू सगळेच फोनमध्ये डोकं खूपसून बसले, इमारतीत भटकून आले. एकमेकांच्या ओळखी करुन घेणं भागच होतं. नाहीतर करायचं काय इतक्या वेळाचं?
सत्यासत्य
लटिका संसार । गुंतवितो फार । सावलीचा भार । तैसे होय ।।
मृगजळी पूर । भय ते जीवास । साच अविनाश । दिसेचिना ।।
कृपाळुवा तुम्ही । सर्व संत जन । दाखवी निधान । सत्य थोर ।।
दूर होता जाण । दुःस्वप्न भीषण । शांति समाधान । लाभे जीवा ।।
घेता अनुभूती । सत्याचीच सदा । गोंधळूक कदा । होईचिना ।।
निवांत निश्चल । होवोनिया मन । श्रीहरी चरण । चिंतीतसे ।।
ॐ तत् सत् ।।
निधान = ठेवा, खजिना
ज्ञानदेवी साच । माऊलीच मूर्त । देतसे अमृत । साधकासी ।।
शांत मनोहर । देखणे नितळ । कोवळी विमळ । शब्द रत्ने ।।
निववी साधका । शब्दचि कौतुके । भाव अलौकिके । ठसविती ।।
ओवी ओवीतून । ज्ञान योग कर्म । दावितसे वर्म । ज्ञानदेवी ।।
सद्गुरुंच्या मुखे । अाकळे यथार्थ । मुख्य तो भावार्थ । ठाई पडे ।।
एकचित्त भावे । पठण मनन । ह्रदयी स्मरण । नित्य होता ।।
देतसे अाशिष । माऊली विशेष । साधका निःशेष । सप्रेमाने ।।
समाधान मुख्य । भक्तिभाव खूण । माऊली संपूर्ण । कृपा करी ।।
माणूस निघतो समाधानाच्या शोधात
सगळीकडे फिरतो, खूप खूप शोधतो
पण समाधान काही सापडत नाही
वाटेत त्याला अनेक माणसं भेटतात
त्याच्यासारखीच, पण वाट चुकलेली
सगळे एकमेकांना विचारत राहतात
पण समाधान कोणाकडेच असत नाही
समोर असतात असंख्य वाटा
कोणती वाट पकडायची कळत नाही
पकडलीही एखादी वाट तरी
पार कशी करायची उमगत नाही
त्या वाटेवरसुद्धा असतात अनेक वाटाडे
वाट दाखवण्याचं आश्वासन देत
आधी पोहचवलेल्या माणसांच्या
कहाण्या सांगत आणि फुशारक्या मारत
माणसे त्यांच्यावर विश्वास ठेवतात
पण माणसांचा शिधा हडप करुन
वाटाडे गडप होतात आणि
माणसे मात्र फिरत राहतात
पुन्हा त्याच अनोळखी वाटांवर
अशीच एक बुधवारची संध्याकाळ होती. मी कार्यालयातुन लवकर घरी येत होतो. म्हणजे फारसा लवकर नाहि, रोज मला आठ साडेआठ वाजत होते आज साडेसहा वाजले होते.
आमच्या अपार्ट्मेंट समोर येताच मला जोशी काका दिसले, एकटेच कठड्यावर बसले होते. मी म्हंटलं पाहुया ओळख लागते का.
मी: काका ओळखलंत का?
काका: अं, चेहरा ओळखीचा वाटतोय, नाव आठवत नाहि.
मी: काका मी केदार, इथं राहतो. मी समोरच्या बिल्डींगकडं बोट दाखवत म्हंटलं.
काका:अरे तु तर बेंगलोरला गेला होतास ना? नोकरीसाठि?
मी: हो काका (मी मनातल्या मनात काकांच्या स्मरणशक्तीचं कौतुक करत म्हंटलं) आता परत आलोय पुण्यात सहा महिने झाले.
काका: छान छान. बरं आहे ना सगळं?