ताई तूच माझी माऊली
तू एक माऊली,
तुझ्यात देवाची सावली .
सूर्यासारखी तेजस्वी,
चंद्रासारखी मावळ.
सर्वांना प्रकाश देणारी ज्योती,
चमकणारा मोती.
तुझा सहवास जणू,
देवाचा भास.
भक्तांच्या हाकेला धावणारी ,
आणि नवसाला पावणारी .
सर्वांना सावरणारी ,
सर्वांच्या मनात वावरणारी .
वादळ पावसात,
असतो तुझा आधार.
घेऊन हातात हात,
मिळेल तुझी साथ.
सर्वांच्या मदतीस धावणारी,
मानवरूपी देवी तू.
काय सांगू तुझी कीर्ती,
शब्द अपुरे पडतील.
-- आरती शिवकुमार