Submitted by तो मी नव्हेच on 26 July, 2020 - 13:13
मी लिहिले चार शब्द जे भावले माझ्या मनी
शाप द्या वा थाप द्या त्या भावनांचा मी ऋणी
मी सुखाचा ही ऋणी अन् मी दु:खाचा ही ऋणी
तेच धन मग मिरवितो मी चार शब्दांचा धनी
धन्यवाद हे ईश्र्वरा तू कूस माझी उजविली
भावना प्रसवून झालो पुरूष जन्मी माऊली
थोर हे उपकार देवा लाज मजला तू दिली
हाव मजला थोरली पण बुद्धी नाही चोरिली
काय वय ह्या लेखणीचे, काय आमुची मगदुरी
खेळ-खेळा वयात वदले, श्री माऊली ज्ञानेश्वरी
-रोहन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
" हाव मजला थोरली पण बुद्धी
" हाव मजला थोरली पण बुद्धी नाही चोरिली " --> Fan झालोय अजून येऊ द्या
सगळी कविता खूपच भारी लिहिली आहेत
धन्यवाद प्रगल्भ जी
धन्यवाद प्रगल्भ जी
तुम्ही नऊ वर्षाँनीच टाकायला
तुम्ही नऊ वर्षाँनीच टाकायला सुरू केल का @तो मी नव्हेच
आधीच्या गझला/कविता दिसत नाहीयेत
नाही, आतापर्यंत काही टाकले
नाही, आतापर्यंत काही टाकले नव्हते फारसे... पासवर्ड पण विसरलो होतो..आता सुरू केले
पुरुष जन्मी माउली - वा वा
पुरुष जन्मी माउली - वा वा
वृत्त, मात्रा कृपया सांभाळा, जर वृत्तबद्ध लेखन करायचे असेल तर!
धन्यवाद बेफिकीर जी. नक्की
धन्यवाद बेफिकीर जी. नक्की प्रयत्न करेन
छान आहे
छान आहे
धन्यवाद तिकोणे सर
धन्यवाद तिकोणे सर