घड्याळात बघितल्यावर लक्षात आले की साडे आठ वाजले, म्हणून तो गडबडीतच उठला, मेस बंद होण्यास पंधरा मिनिटे बाकी होते, म्हणून गडबडीनेच तो मेस च्या दिशेने निघाला. तेथे पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की मोबाईल रूमवरच विसरला आहे, म्हणून पाच मिनिटे इकडे तिकडे बघत बसला. जवळच त्याच्या मेसची मालकीन जी गुजराती होती ती तिच्या मुलाला तिथेच जेवू घालत होती, प्रत्येक घास भरवल्यावर ती आपल्या मुलाच्या तोंडावरून हात फिरवत होती, हे पाहून त्याला त्याच्या आईची आठवण झाली. आजही ज्या बाईचा तेलकट व बेचव जेवण देते म्हणून राग येत होता, त्या बाईचे आईसारखे रूप बघून तो भारावून गेला .
६ मार्च २०२०. मी अमेरिकेहून विमानाने भारतात चाललो होतो. अमेरिकेत आणि सगळ्या जगातच कोरोनाची लागण सुरु झाली होती. खरं तर प्रवास करणं धोक्याचं होतं, पण आईची तब्येत बिघडल्यामुळे भारतात जाण्याला पर्याय नव्हता. विमानात कुणी खोकला, शिंकला की ‘अरे बापरे, याला कोरोनाची लागण नसेल ना?’ एवढा एकच प्रश्न मनात येत होता. विमान मुंबईला उतारण्याआधीच वैमानिकाने कल्पना दिली होती. आरोग्य तपासणीचे दोन फॉर्म भरून घेतले होते. त्या फॉर्मवर भारतातला पत्ता, फोन नंबर, ई-पत्ता इत्यादी माहिती होती. विमानतळावर उतरताच प्रत्येक प्रवाशाचे तापमान पाहून, त्याच्या फॉर्म वर शिक्के मारून जाऊ दिले होते.
काही व्यक्तींना जन्मजात कलाकार होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची देणगी मिळालेली असते। अशा व्यक्तींना कला शिकवावी लागत नाही. दूध पित्या वयातल्या आणि बोबडे शब्द बोलायला लागलेल्या लहानशा मुलाला गाणं ऐकून तंद्री कशी लागते, याचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध घेणं मला तरी अशक्य वाटतं. कुठल्याशा पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधातून जन्मजात बरोबर आलेली ही शिदोरी ज्याच्याजवळ असते, ती व्यक्ती माझ्या मते विधात्याने केवळ सर्वसामान्य मनुष्यप्राण्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठीच गंधर्वलोकातून खास या पृथ्वीतलावर पाठवलेली असते.

"माझी अविस्मरणीय गिरनार यात्रा"
नाताळ झाला. अजून काही दिवसांनी ३१ डिसेम्बर येईल. दारूच्या पार्ट्या झडतील. मायबोलीवर "दारू कशी पिता" अशा धाग्याला शेकडो प्रतिसाद येतात. अर्थातच इथे ड्रिंक घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हा धागा त्यांनी व इतरांनी सुद्धा वाचवा म्हणून मुद्दामहून लिहित आहे.
प्रकटीकरण: जे जसे घडले तसे सांगत आहे. शहराचे नाव व बाकी व्यक्तिगत तपशील सांगत नाही कारण त्याची आवशक्यता नाही. ("केवळ प्रतिसाद मिळवण्यासाठी केलेले खोटेनाटे सनसनाटी लिखाण" असे आरोप ज्यांना करायचे आहेत त्यांनी हे लिखाण वाचले नाही तरी माझी हरकत नाही)
नमस्कार वाचक मित्रहो ! लोकल डायरी चे ३० भाग प्रकाशित झाले होते . ज्यावेळी मी लोकल डायरी लिहायला सुरुवात केली, त्यावेळी काही कारणांमुळे तिचे केवळ तीनच भाग लिहू शकलो , पण नंतर हळूहळू तीनचे तीस कधी झाले माझं मलाही कळलं नाही . लोकल डायरी संपली आहे , असं मला वाटत होतं , पण वाचकांच्या प्रेमामुळे व सुंदर प्रतिक्रियांमुळे मला लोकल डायरी आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा मिळाली . मधू आणि अँटीव्हायरसची लव स्टोरी , आणि त्या भोवती फिरणाऱ्या लोकल ट्रेनमधल्या ग्रुपच्या इतर सदस्यांच्या सुरस कथा घेऊन लोकल डायरीचे दुसरे पर्व लवकरच आपल्या भेटीला येत आहे . लोकल डायरी - सिझन १ संपले . आता सिझन २ !
(भाग १)
'विपश्यना केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या समोरची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कातळकड्याखाली आणून सोडते.' - इति गूगल
आणि गूगल मॅप्स ना साक्षी ठेवून आम्ही विपश्यना केंद्राच्या प्रवेश द्वारापाशी पोहोचलो. बघतो तर काय त्या प्रवेशद्वारासमोरची सोंड गायब झाली होती.
----------------------------------------