निसर्ग

निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

विषय: 
शब्दखुणा: 

चंदेरी धबधब्यांची माळ (- मोठी प्रचिसहीत)

Submitted by धनश्री on 1 May, 2012 - 16:14

चंदेरी धबधब्यांची माळ अर्थात Silver Falls State Park. अमेरिकेच्या उत्तर्-पश्चिम भागातील ऑरिगन राज्यात हे स्टेट पार्क आहे. पोर्टलँड या शहरापासून अंदाजे दीड तासाच्या अंतरात हे ठिकाण येते. निसर्गाने उदंड हस्ते लयलूट केलेली एक देखणी जागा. दहा सुंदर धबधब्यांचा नजारा आणि डोळ्यांना थंडावा देणारी हिरवीगार शाल. परवाच एप्रिलमधल्या शेवटच्या विकांताला २ दिवस तिथे कॅम्पिन्ग ला गेलो होतो. त्याचा हा प्रचि वृत्तांत. काही प्रचि मी तर काही नवर्‍याने काढली आहेत.

हे पार्क खूप जुने आहे. अंदाजे ९००० एकरात पसरले असून प्रचंड मोठी डग्लस फरची झाडे सर्वत्र दिसतात. यातील काही झाडे १०० पेक्षा जास्त वर्षे जुनी आहेत.

गुलमोहर: 

शाम के साये...

Submitted by rar on 30 April, 2012 - 20:47

ऑलिंपीक नॅशनल पार्क, वॉशिंग्ट्न स्टेट, यु.एस.ए.

गुलमोहर: 

राज-ए-desert (II) : ब्राईस कॅनियन

Submitted by rar on 26 April, 2012 - 19:54

ब्राईस कॅनियन अ‍म्फिथिएटर

ब्राईस कॅनियन नॅशनल पार्क, युटा, अमेरिका

ग्रँड कॅनियन किंवा झायॉन नॅशनल पार्क पेक्षा ही जागा तशी कमी प्रसिद्ध...म्हणजे लौकिकार्थानं हा 'पटेल स्पॉट' नाही. पण निसर्गाचा जो काही चमत्कार इथे पाहायला मिळतो तो अवर्णनिय ! भणाणणारा वारा, पाणी आणि बर्फ यामुळे दगडांची झालेली झीज .. हे या सौदर्यांचं रहस्य.

हे अजून काही फोटोज. खूप लांबवर (जवळ जवळ १००-२०० मैल) पसरेलेले कॅनियन आणि अ‍ॅम्फिथिएटर

गुलमोहर: 

निसर्ग

Submitted by हितेश वन्यजिव छ... on 26 April, 2012 - 11:35

निसर्ग हा दानशूर आहे. परंतु निसर्ग बोलत नाही. पण कृती करतो.

मित्र हा दु:खात आणि सुखात सहभागी होतो. निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही. आपल्या समाजात विषमता आहे. माणूस विषमतेने वागतो. परंतु निसर्ग विषमतेने वागत नाही. म्हणूनच निसर्ग ह मला माणसापेक्षा जवळचा सोबती वाटतो.

झाडं, नदी, समुद, पाणी, रंग, निसर्गाने खूप किमया केली आहे. 'सोनचाफा'फुलामध्ये नाही का, पिवळ्या रंगााच्या पाकळ्या आणि त्याचा देठ हिरवा.

म्हणून मला निसर्गाविषयी असे म्हणावेसे वाटते,

अनंत हस्ते कमला वराने (निसर्गाने)

देता घेशील दो कराने.

निसर्ग जो आपल्याला भरभरून देत असतो.

विषय: 
शब्दखुणा: 

ये जमी चुप है.. आसमा चुप है

Submitted by rar on 26 April, 2012 - 11:31

निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,

विषय: 
शब्दखुणा: 

ग्रनियन रन, एक अनोखा अनुभव

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गेल्या महिन्यात ग्रनियन (Grunion) रन अनुभवायला मिळाला. मॅरॅथॉन्सचे इतके पेव फुटले आहे की आधी तसाच हा ही एखादा रन असावा असे वाटले. पण हे सामन (Salmon) रन्सच्या जास्त जवळ आहे हे थोडी माहिती मिळवताच लक्षात आले व तिथे जायचे हे लगेच ठरविले. ग्रनियन्स हे चार-सहा इंच लांबीचे मासे दक्षिण कॅलिफोर्नीयाच्या समुद्रतटाजवळ आढळतात. तीन-चार वर्षे जगु शकणाऱ्या या माश्यांनी पुढच्या पिढीला जन्म देण्याचा एक अनोखा प्रकार उत्क्रांतीच्या वैविध्यपूर्ण विश्वाला बहाल केला आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

कुमार

Submitted by निरंजन on 28 March, 2012 - 00:29

नुकतच मला कोणीतरी विचारल की तुझा आवड्ता पक्षी कोणता मी म्हणालो, "माझा आवड्ता पक्षी कावळा". ऎकणार्‍याच तोंड जरा वेडवाकड झाल.

तुम्हाला सुद्धा विचित्रच वाटत न !

या कावळ्याची व माझी गट्टी झाली तीच मुळी "एक घास काऊचा, एक घास चिऊचा" पासुन.

"कावळ्याच घरट शेणाच व चिमणीच मेणाच" या गोष्टीत, घर वाहुन गेलेल्या त्या कावळ्याला ती चिमणी किती त्रास देते. बिचारा कावळा, मला त्या लबाड चिमणीच केलेल कौतुक कधीच आवडत नव्हत. त्या चिमणीचा मला फ़ार राग यायचा.

किती बिचार्‍या ह्या प्राण्यावर माणसानीसुद्धा अन्याय केलाय. त्याला पार खालच स्थान दिलय.

कावळा म्हणे "मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग