या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.
माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्यापैकी सुसह्य करतो.
'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
आशीर्वचन - वृक्षराजाचे !!
खाली दोन वेगवेगळ्या लेखकांचे लिखाण उद्धृत केले आहे.
१] अ हर्मिट इन द हिमालयाज - लेखक मि. पॉल ब्रंटन - / मराठी अनुवाद - हिमालय नि एक तपस्वी - अनुवादक - श्री. गणेश नी. पुरंदरे - पान क्र. २१६ -२१९
ही हिरवी हिरवी झाडे
हे निळेजांभळे डोंगर
या गोजिरवाण्या वेली
अविरत पक्षांचा वावर
वारा भिरभिरला तेथे
गवताची होते थरथर
कुरणातून नकळत येते
ती साद कुणाची आहे....ही बाग कुणाची आहे
डोकवला हळूच दिनकर
जागवून डोंगरमाथे
घरघरले धरतीवरती
तांबूस पिठाचे जाते
पसरून कोवळी किरणे
नभ रंगून उत्कट होते
सावलीस गहिवरलेल्या
जरतार उन्हाची आहे...ही बाग कुणाची आहे
रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकूम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली
क्षितिजावर लुकलुकणारी
फ़ुलवात कुणाची आहे...ही बाग कुणाची आहे
निजताच रवी घरट्याशी
चंदेरी दिसते अंबर
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
आस ही मूर्त झाली
ऋतू आगळा हा ऋतू सावळा हा
ऋतू पावसाळी कसा साजिरा हा
भले थोरले मेघ हे वर्षताती
जळा निर्मळाते बहू ओतताती
घनाकार होता असे अंतराळी
रवीने पहा त्यागिली ते झळाळी
कसा वायु तो शीत कोंडे उराशी
नवा श्वास घेते धरित्री जराशी
नवे थेंबुटे देत संजीवनी का
नवा साज लेती वनी वल्लरी का
मनाला तशी येतसे ही उभारी
नव्या अंकुरे आस ही मूर्त झाली
निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
मागे एक मला न सुटलेले कोडे तुम्ही वाचले असेलच. आणि मग एका नवीन गोष्टीला सुरुवात झाली. मार्चचा शेवट आणि हे महाराज झोक्यावर बसून गोड गाऊ लागले. मैत्रिणीला बोलावू लागले.
मध्येच आत येऊन पाहणी करून गेले.