खिडकी
खिडकी.........
कळायला लागल्यानंतर जाणवलेली एक गोष्ट ती म्हणजे मला खिडकी कायम आवडते.खिडक्यांच हे माझ वेड खूप जून आहे.आमचं मुरूडच घर खूप जून आणि पारंपारिक कोकणी पद्धतीच आहे. त्या घराला कोनाडे,खुंट्या,अडसर आणि तश्याच जुन्या पद्धतीच्या ‘खिडक्या’ तर खिडक्यांच्या ह्या प्रवासातील पाहिलं ठिकाण म्हणजे त्या घरातील त्या खिडक्या. त्यातल्या एका खिडकीतून मी वाडीतल्या नारळ,सुपारीच्या बागा खूप पहिल्यात. मुळात दुपारी मी कधी झोपतच नाही आणि शाळेतल्या परीक्षाजवळ आल्या कि आई दुपारी अभ्यासाला बसवायची त्यावेळी मी असाच खिडकीवर बसून अभ्यास करत असे म्हणजे खिडकीतून बाहेर बघण्याचा अभ्यास चालू असे.
खिडकी
आमच्या घरी एक होती खिडकी,
बाकी सगळे ठीक एक दात पडकी.
उगीचच मला बघून हसायची,
मी पडदा लावला कि मग गाल फुगवून बसायची.
दिवस रात्र ती काहीना काही बोलायची,
ऊन,वारा,पाऊस सार तीच झेलायची.
उन्हाची किरणं हळूच आत पाठवायची,
मला उशीर झाला कि हमखास तीच उठवायची.
बघाव म्हटलं बाहेर कि, तिचा एक दरवाजा खोलायचो,
तिझ्याशीच बसून मी सार मनातलं बोलायचो.
एक दिवस मग ती मला बघून हसलीच नाही,
तिची ती दात पडकी मुद्रा मला दिसलीच नाही.
कारण, तिला सोडून आम्ही दुसरीकडे जाणार होतो,
तिलाही माहित होत परतून कधीच न येणार होतो.
खिडकी
चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायडींग असलेली, हवा आत बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल बेडरूम च्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याच रूप दिल जात. मग हळू हळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते.
खिडकीतला पाऊस!
दोन दिवसांपूर्वीच मुंबईत हळूहळू पावसाला सुरुवात झालीय. घामाची चिकचिक आणि उन्हाने त्रस्त झालेल्यांचा, आता पावसाचे आगमन होणार याची नांदी मिळाल्याने जीव सुखावला आहे. पावसाच्या सरी पडलेल्या पाहून मला तर आनंदाने नाचावासे वाटू लागले, आणि मी फेसबुकवर पोस्टसुद्धा टाकली. "पाऊस आया!!!.....एssss पावसामें नाचोssss!!!!...... ढिंगचॅक्! ढिंगचॅक्!! ढिंगचॅक्!!!......." मोराला आपला पिसारा फुलवून पावसात नाचताना जेवढा आनंद होत असेल तेवढाच मलाही पहिल्या पावसात भिजताना आनंद होतो.
मला कबुतरे आवडतात
मला कबुतरे आवडतात
शुभ्र गिर्रेबाज आवडतात
मीच पाळलेली आवडतात
फक्त माझ्याच शीळेच्या लयकारीवर
गोफणीतल्या दगडा सारखी आभाळी घुसणारी
ढगांचे रेशमी तुकडे चोचीत घेऊन परतणारी आवडतात
ज्यांच्या पायात रंगीत मण्याची पैन्जणे असतात
जी माझ्या कवितेच्या वहीवरून ठुबुक ठुबुक चालत जातात
न जाणे कोणत्या भाषेतली गाणी गळयात घोळवून घोळवून म्हणतात,
मृत्यूवर लिहिलेल्या कविताही मग मधाळत जातात
माझ्या खिडकीखालून उगवलेल्या पिंपळाची पाने तर
चैत्रफुंकर पडण्याआधीच तांबुसतात
६ व्या मजल्यावरील खिडकी
खिडकी – जगापासून अलिप्त राहून जगाचं निरीक्षण करण्याची जागा!
माझं लहानपण बैठ्या घरात गेलेलं. घराला खिडक्या होत्या पण बाहेरचं जग अगदीच नजरेच्या टप्प्यात होतं. खिडकीचा अलिप्तपणा तितकासा नव्हता. २००१ साली आम्ही दहिसरला ६व्या मजल्यावरील घरात राहायला आलो आणि खिडकीची एक वेगळी मजा कळली.
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४)
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
येत असावा महान कंटाळा,
किंवा असावी सर्दी तिला!
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'कॉफी' उडून जाता
असेल टाकला चहा
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
किरणांनी भाजले का
सूर्याच्या तिला?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दीर्घाचा र्हस्व होता...
का राग राग करते?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
खावी बिस्कीटे कशी?
- प्रश्न पडला तिला
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दुष्ट 'तो' असावा
त्या भ्रमरापरी
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
असेल का वृत्ती,
'सनातन' फार त्याची?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'वृत्तात' राम नाही
का वाटले तिला?
