तुमच्या खिडकीतून काय दिसते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2022 - 12:33

किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्‍याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्‍याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...

चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.

जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.

टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्‍या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....

नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !

हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो Happy
येऊ द्या.....

IMG_20220628_214559.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप महत्वाचा विषय हाती घेतला सर आपण. कोणाचे सरकार येणार यापेक्षा तुमच्या खिडकीतुन काय दिसते हा खरा प्रश्न आहे. प्रतिसाद द्यायला थोडा उशीर झाला. गैरसमज नसावा.

माझ्या खिडकीतून डोंगर दिसतात आता पावसात तर फार सुंदर दिसते पण इकडे फोटो लावता येत नाहीयेत...
>>>>

आमच्या ऑफिसचे खारघरला राहणारे मित्रही डोंगर आणि स्पेशली पावसाळ्यात दिसणार्‍या द्रुश्याचे कौतुक करत असतात. आम्हीही घर शोधताना एकदा खारघरलाही चक्कर टाकलेली तेव्हा असे व्यू बघून आलेलो.

बाकी फोटो ईथे अपलोड करायचा प्रॉब्लेम आहे का? मी ब्राऊसरमधून करतो. अ‍ॅपमधून अपलोड करणे मलाही जमत नाही. साईजचा प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनशॉट घ्यावा. आणि क्रॉप करावा. मी असेच करतो.

ओके. म्हणजे काढला आहे. पण टाकणार नाही Happy

मी फर्स्ट जॉबला होतो तिथे समोर एअर हॉस्टेसचे हॉस्टेल होते. रोज आम्ही वर कॅंटीनला जायचो आणि तिथल्या बाल्कनीतल्या कट्ट्यावर गप्पा मारायला बसायचो. तिथून त्यांची बिल्डींग आणि दोन माळ्याचीच बिल्डींग असल्याने टेरेसही दिसायचे. कधीही जा, टेरेसवर चार एअरहॉस्टेस असायच्याच. अर्थात आम्ही फोटो कधीच काढला नाही. कारण ऑफिसमधून सक्त ताकीदच होती. समोरून तक्रार आली तर कामावरून काढून टाकू Happy

पहाटेचं आकाश दिसतं,सूर्योदय दिसतो.
म्हणजे अजून तरी दिसत आहे..( बेडरूम खिडकीमधूनही दिसते. हा विषय आगामी धाग्यासाठी) पुढे टॉवर आले की दिसणार नाही.

[ खिडकीतून/ बाल्कनीतून काही दिसलं नाही तरी चालेल. पण पूर्व किंवा दक्षिणेला असावी. टीवीची डिश लावायला बरे पडते.]

घराला खिडक्या नसून गवाक्षे आहेत. गवाक्षातून काय दिसते असा धागा असता तर लिहीले असते. गवाक्षातून जंगलात गवे फिरताना दिसतात. ते छान गातात. त्यांच्या गाण्याने जंगलातल्या तख्तपोशींना लावलेले झुंबर हलताना मनोहर दिसतात. त्यातून एका बाजूने चंद्र आणि एका बाजूने सूर्याचा प्रकाश विक्रणाने इंद्रधनुष्यात परावर्तित होऊन रंगांचीउधळण झालेली दिसते. आमच्या पूर्वेच्या गवाक्षातून मात्र जंगलाऐवजी हिंदी महासागर दिसतो. इशान्येच्या गवाक्षातून प्रशांत महासागर दिसतो.
आमच्या बाल्कनीतून माउंट एव्हरेस्ट दिसते आणि ड्राय बाल्कनीतून अंटार्क्टिका.
( तुमच्या बाल्कनीतून काय दिसते असा सेपरेट धागा निघणार असेल तर तिकडे पण देईन हा प्रतिसाद)

हा व्ह्यू आमच्या ठाण्याच्या घरातून दिसतो
03AC3871-C392-4428-AD01-2C3595CAE8A6.jpeg

हा डोंबिवलीतल्या घरातून
7069AC83-81D9-42B9-98E2-BF7E59371BBF.jpeg

हा गावच्या घरातून
04695FDE-2137-4DE5-9137-D39488B10BFF.jpeg

हा अमेरीकेतल्या घरातून
62D770C3-BA0B-4E34-8D5E-8451E04F0E77.jpeg

हुश्श, अजून काही घरं बाकी आहेत .. शोधून टाकते फोटोज

बाब्बौ! म्हाळसा, गुवाहाटीची ट्रीप केली होती का कधी?
ते गावाकडचं घर मला दिलं तर माझ्या पाळीव प्राण्यांची सोय होईल.

आमच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून खाली रस्ता आणि समोर आकाश, पहाट असेल तर सूर्योदय, मळभ असेल तर ढग, उजेड असेल तर पक्षी, रात्र असेल तर तारे, शुक्ल पक्ष असेल आणि संध्याकाळ किंवा रात्री लवकरची वेळ असेल तर चंद्र, वद्य पक्ष संपत आला असेल आणि पहाट असेल तरी चंद्र असं सगळं दिसतं!
बाकी खिडक्यांमधून फारसं काही दिसत नाही!

स्वत:च्या खिडकीतुन काय दिसते हे पहाण्याचे कुतुहल सर्वांनाच असते पण दुसऱ्यांच्या खिडक्यांमधुन काय काय दिसते हे जाणुन घेण्याची हौस कौतुकास्पद म्हणावी लागेल.

ते दुर दिसणारे डोंगर >>> कोणते का असेनात, जोपर्यंत कुणी जाळत नाही तोपर्यंत डोळे भरून बघून घ्या.

ठाणे काहीच्या काहीच मॉडर्न दिसू लागले आहे. वर म्हाळसा ने ठाणे सांगितले म्हणून. नाहीतर युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका काहीही म्हणून चालले असते. खूप वर्षे झाली ठाण्यात जाऊन.

दुर दिसणारे डोंगर
इमारतीवरचा - बदलापूर डोंगर म्हणतात. पण बदलापूर स्टेशन मात्र उजवीकडे अंधूक दिसतो तो 'नवरानवरी' डोंगरामागे आहे. सर्वात उजवीकडे एक किरंगळीवाला हाजी मलंगचा डोंगर आहे.

छान प्रतिसाद आलेत Happy

हे आमच्या ईथून दिसणारे डोंगर. धुक्यांनी जरा काळवंडलेत. चालवून घ्या. तसेही गेले वर्षभरात कोपरखैरणे स्टेशनला लागून भरभर ३०-३५ माळ्यांच्या काही बिल्डींग ऊभ्या राहिल्याने हे आता तुटक तुटक दिसतात.

IMG_20220629_112830.jpg

पण तरीही रोज सकाळी सुर्य याच डोंगरापलीकडून ऊगवतो Happy

IMG_20220629_114316.jpg

वा सगळे फोटो मस्त. हा शेवटचा फोटो रा. फा. नाईक / सेंट मेरिज शाळेचा आहे का ? किंवा जवळपासचा एरिआ
पावसामुळे अजुन छान छान फोटो बघायला मिळतील

निलाक्षी, कर्रेक्टाय Happy सेंट मेरीचा आहे. राफा नाईक जिथून फोटो काढलाय त्या फूटपाथला आहे.
तुमचे काही कनेक्शन आहे का या जागेशी?

पण आधीचा फोटो कोपरखैरणेतील वाटत नाही! >>> मी आतापर्यंत टाकलेल्या प्रत्येक फोटोत ती शाळा आहे. म्हणजे सगळेच तिथलेच आहेत.

आणि हो सगळे फोटो घराच्या खिडकीतूनच काढले आहेत. आमचे घर एवढेही मोठे नाही की त्याची एक खिडकी कोपरखैरणेला आणि एक वाशीला असेल Happy

Pages