तुमच्या खिडकीतून काय दिसते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2022 - 12:33

किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्‍याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्‍याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...

चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.

जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.

टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्‍या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....

नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !

हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो Happy
येऊ द्या.....

IMG_20220628_214559.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा हेअर ड्रायरवाला धागा सापडत नाहीये मला.
>>>
मायबोली धागा क्रमांक ७९७१०
मला माझे धागे पाठ असतात Happy

रोजच्या वापरासाठी हेअर ड्रायर चांगला की वाईट?
https://www.maayboli.com/node/79710

दोन्ही फोटो एकाच खिडकीतून आहेत.

पहिला आहे तो समोर जॉन्सन फॅक्टरी. मागे ते फॅन्सी अपार्ट्मेंट काँप्लेक्स आहेत. कॉलोनी भाग म्हणे. हे दिवाळीत फार सुरेख दिसते.

दुसरा आमची झाडी आमचा डोंगार. हे कधी पन सुरेखच दिसते. ते वर एक त्रिकोणी छप्पर आहे ते मंदिर आहे. मला उगीचच ते शोलेतले गाव वाट्ते. कधीतरी एकदा बघायला जायचे आहे आटो घेउन.

अमा, अगदी गर्द झाडी आहे.
एकाच खिडकीतून एकीकडे डोंगर झाडीतले गाव आणि दुसरीकडे टोलेजंग ईमारती Happy

@ निलेश, पुर्ण शहरच दिसते की खिडकीतून.. कुठले आहे ?

आम्हालाही आधी मुंबईच्या घरातून वानखेडे स्टेडियम दिसायचे. स्पेशली डे नाईट मॅचला लाईटस लागलेले. चटकन नजरेत यायचे. पण आता मध्ये झाले टॉवर आणि लपले ते स्टेडियम..

20200521_192651.jpg
हे आमच्या खिडकीतून ......... गोराई. ती बिल्डिंग दिसतेय ना तिकडे खाडी आहे जेट्टी पकडून पलीकडे जाता येते गोराई बीच आणि एस्सेल वर्ल्ड, पॅगोडा।

20200603_190409.jpg20200409_192034.jpg
त्या फ्लड लाईट्स गोराई डेपोच्या रात्री खिडकीचे पडदे नाही लावले तर उजेड येतो घरात।

हे आमच्या न्यू जर्सी आणि Dallas मधील बाल्कनी मधून दिसणारे दृश्य
IMG-20180330-WA0030.jpg81464d363747381ca8f99aa5020cedb1.jpg20211207_173343.jpg

काय सुंदर दृश्य आहे निशा
(तुम्ही सगळे सेलेब्रिटी आहात की काय, अश्या सुंदर व्ह्यू वाल्या ठिकाणी सर्वांची घरं आहेत) Happy

काय एकसे एक फोटो आहेत या धाग्यावर claps claps claps

>> तुम्ही सगळे सेलेब्रिटी आहात की काय
+११११

"स्वर्ग चार बोटांवर" असा एक वाक्प्रचार होता पूर्वी त्याचा प्रत्यय येतो.

मेरे सामनेवाले खिड़की में एक चाँद का टुकड़ा रहता है. माझ्या खिडकीतून असाच चंद्रतुकडा दिसतो. पण सध्या ढगाळ असल्याने गायब आहे. होय, खरोखरच्या चंद्राविषयी बोलतोय.

हा धागा फेसबुकवरील ' View from my window ' वरून प्रेरित आहे का?
तो फेसबुक पेज उच्च सुंदर आहे. 99.99% बाहेरच्या देशातील लोकांनी शेअर केलेले फोटो असतात, पण परवा चक्क एका पुण्याच्या काकूंनी टाकलेला त्यांच्या बंगल्याची बाग आणि बाहेर कारंजात उमललेल्या कमलांचा फोटो शेअर केला होता. भारत आणि कमळ पाहिल्यावर गोऱ्यानी भरभरून प्रतिसाद दिले होते. काकु पुणेरी तशी मी पण पुणेरी त्यामुळे मी फक्त Like करून आले : फिदि:

इथे सगळ्यांनी शेअर केलेले फोटो सुंदर.... अप्रतिम. माझ्या बाल्कनीत किंवा बेडरूमच्या खिडकीतून आर्मी ट्रेनिंग ग्राउंड दिसतं. 40 एकर्सचा मोठा मोकळा भाग आहे, जिथे ट्रेनिंगज होतात, फार काही शेअर करत नाही, पण इतर वेळेस सुंदर शांत असणारा भाग काही वेळेस तासनतास थरारक ट्रेनिंगजने खिळवुन ठेवतो.

आर्मी ट्रेनिंग ग्राउंड दिसतं
>>
भारी मीरा...
मला समोरच्या मैदानात मुलांना खेळताना बघायला फार आवडते.
आर्मी ट्रेनिंग बघणे तर काय भारी वाटत असेल.

आणि हो, धागा कुठून सुचला हे लिहिले आहे सुरुवातीला. फेसबूक मी फार वापरत नाही. असे फेसबूक पेज असेल तर नक्कीच देशोदेशीचे भारी फोटो असतील.

आजचा ताजा ताजा फोटो - खारुताई Happy

सुट्टी म्हणून सकाळीच ऊठल्यावर सिनिअर ज्युनिअर दोन्ही ऋन्मेष नवीन बाल्कनीत निवांत बसलो होतो. तेव्हा हि दिसली. दुसऱ्या माळ्यावर गार्डन आहे. ग्रांऊंडवरून मोठाल्या वृक्षांच्या फांद्या सहज तिथवर पोहोचतात. त्यामुळे त्यावरून खारूताई ईकडून तिकडे बागडत असतात. ईथल्या बाल्कनीच्या अगदी खालीच हा तंबू असल्याने छानपैकी तिच्या लीला बघता येतात.

हा झूम करून

IMG_20220702_115406.jpg

हा विदाऊट झूम - पण हा काढेस्तोवर ती पळाली.

IMG_20220702_115419.jpg

काल हिची एक मोठी बहिण आमच्या बाल्कनीतही आली होती.

या खारुताई खेळताना जाम आवाज करतात माझ्या आधीच्या घरी कॉमन बाल्कनी होती आणि बिल्डिंग खाली पुष्कळ झाडे होती नारळाची, सुपारीची, आंबे, जांभूळ , अळशी, कढीलिंब , व एक क्रिसमस ट्री सुद्धा.
उंच झाडे माझ्या मजल्यापर्यंत होती तेव्हा या खारुताई बाल्कनीत येत आणि नुसता गोंधळ घालत। त्यांच्या आवाजाचा अगदी कळसबिंदु असायचा। सुट्टीच्या दिवशी घरी असल्यावर मी अक्षरशः काठीने त्यांना हाकलून लावायचे। हा हा हा हा

आताच्या घरी मैना, कबुतर (I hate pigeons ) कोकीळ , कावळे , चिमण्या आणि कधी कधी छोटे छोटे पोपट आवाज करून गोंधळ घालतात। (मी अभयारण्यांत राहत नाही, पण बोरिवली म्हंटली कि गोराई आणि गोराई म्हटली कि खाडी आणि दूरवर पसरलेली खारफुटीचे जंगल व डोंगर त्यामुळे वेगवेगळे पक्षी सहज बघायला मिळतात. आकाशवाणीच्या जंगलात तर कोल्हे आहेत असे माझा नवरा म्हणतो त्याने बघितलेत ख खो देवाला माहित पण रात्री मोठ्याने कोल्हे कुई सदृश - (कुत्र्यांच्या रडण्याचा म्हणता येईल ) आवाज येतो खरा ).

अरेच्चा ! काल खारूताईचेच व्हिडीओज आणि फोटोज बघत होतो. एकाने तर एक खारूताई पाळलेली आहे. (भारतात नाही). लाकडी जिना पाहून डोळे तृप्त झाले.
सुंदर व्ह्यूज आलेत सर्वांचे. पण खिडकी पण येऊ द्या ओ.
सिंहगडाचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. आत्ता पाऊस पडल्यावर अजून छान येईल.
कालच दुकानाच्या मागच्या जागेतून सिमेंटच्या पाईपमधे शिफ्ट केलंय. प्रशस्त जागा आहे. दोन्ही बाजूला खिडकी म्हणजेच दार आहे. जमल्यास गोल व्ह्यू टाकेन.

कालच दुकानाच्या मागच्या जागेतून सिमेंटच्या पाईपमधे शिफ्ट केलंय. प्रशस्त जागा आहे>> पाघो फिट झाला का त्याला दुसरा पाइप घ्यावा लागला?

अमा Rofl

त्याला मांडीवर बसायची सवय आहे लहानपणापासून . आता त्याच्यापासून संरक्षण म्हणून मी पाईपमधे आणि तो बाहेर अशी व्यवस्था केली आहे.

Pages