किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...
चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.
जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.
टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....
नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !
हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो
येऊ द्या.....
मुंबईतील माड दिसणाऱ्या चाळी
मुंबईतील माड दिसणाऱ्या चाळी आता डायनासोर पूर्व काळात जमा झाल्या आहेत
आमच्या घराच्या खिडकीतून
आमच्या घराच्या खिडकीतून पॅगोडा दिसतो गोराईचा. सध्या smog आणि धुळीमुळे चांगले फोटो येत नाहीयेत.
मुंबईतील चारकोप गोराई भागात सगळ्याच बिल्डर्स आणि घरे विकणाऱ्यांचा एक पॉइंट असतो 'आमच्या इथे खिडकीतून पॅगोडा दिसतो '. सध्या खूप बिल्डिंग redevelope होत आहेत. पॅगोडा view असलेली खिडकी असेल तर फ्लॅट ची किंमत वाढवून सांगत आहेत. इथल्या एका बिल्डिंगचे नावच पॅगोडा view असे ठेवले आहे.
पॅगोडा शिवाय कोळीवाडा आणि त्यात असलेले मस्त सुंदर बंगले आणि इलेक्ट्रिक वायरवर बसलेले विविध पक्षी हे पण आमच्या खिडकीतून दिसते.
खंड्या, ब्राह्मणी घार, पोपट, कावळे, कबुतर, कोकीळ कोकिळा, बारीक छोटी वटवाघुळे, आणि असंख्य migratory birds काही ओळखता येतात काही नाही.
मला फोटो नीट upload करता येत नाही.
भरपूर फोटो काढलेत.
ह्या वर्षी बिल्डिंग खाली लावलेल्या आंब्याला खूप लवकर मोहोर आला. बऱ्याच कैऱ्या पण लागल्यात कधीच्या. आता कैऱ्या मोठ्या होत आहेत.
सगळे लोक चकित होत आहेत ते बघून.
>>>>>>खंड्या, ब्राह्मणी घार,
>>>>>>खंड्या, ब्राह्मणी घार, पोपट, कावळे, कबुतर, कोकीळ कोकिळा, बारीक छोटी वटवाघुळे, आणि असंख्य migratory birds काही ओळखता येतात काही नाही.
अहाहा!!! किती भाग्यवान आहात.
परवा मी इथे नॉर्थ अमेरिकेत बागेत फिरत होते मला ३ ते ४ नवीन आणि धिटुकले पक्षी दिसले. इतकं मस्त वाटलं ना.
रोहिणी, आपले वर्णन वाचून फोटो
रोहिणी, आपले वर्णन वाचून फोटो बघायची इच्छा निर्माण झाली आहे. मायबोली ब्राउजर वरून वापरत असाल तर फोटो अपलोड करणे अवघड नाही. साईज कमी करावी लागते. जे दोन प्रकारे करता येते. १) फोटो व्हॉटसअप वर शेअर करून तिथून पुन्हा सेव करावे. २) स्क्रीनशॉट घ्यावा.
तोपर्यंत मी गूगल करून पॅगोडा व्ह्यू बघतो
@ सामो, हो. नवनवीन रंगीबेरंगी
@ सामो, हो. नवनवीन रंगीबेरंगी पक्षी दिसणे फार सुखद अनुभव असतो. मुंबईत तसा कमीच. पण इथे जवळपास खाडी आणि मिनी सी शोअर असल्याने काही पक्षी येतात दारात..
असो,
आता आलोय ते खिडकीतून दिसणारा नाताळ सण घेऊन.
सगळे फोटो मध्यरात्री टिपले आहेत. त्यामुळे सर्व फोटोत एक नीरव शांतता आहे.
.
(No subject)
Pages