तुमच्या खिडकीतून काय दिसते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2022 - 12:33

किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्‍याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्‍याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...

चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.

जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.

टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्‍या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....

नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !

हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो Happy
येऊ द्या.....

IMG_20220628_214559.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खिडकी से ये याद आया.
https://open.spotify.com/episode/55uTBdV2gYScMfO1tvYoem?si=KKMRVPJIQ-G2X...

spotify नसेल तर -
फाळणीच्या दुःखद, त्याचबरोबर काश्मीरच्या सुंदर कथा लिहिणारे कृष्णचंद्र (Krishan Chander) यांची “खिडकिया” नावाची सुंदर कथा. spotifyवर त्या आरती जैनने अतिसुंदर अभिवाचन केलं आहे ..

किट्टू आणि ऋ, मस्त फोटो. Happy

साजिरा,

मी 'खिडकियां' ऐकली. एका शांत तळ्यात पूर्ण चंद्राचे बिंब पडते. सहलीवर आलेल्या पर्यटकांना ते आपापल्या खिडक्यांतून कसे दिसते. त्यात एक नवीन लग्न झालेलं, एक पोक्त आणि एक नट-नटीचं जोडपं आपापल्या दृष्टिकोनातून/ स्मृतींमधून तो चंद्र कसा बघतात. शेवटी पोटासाठी हात पसरणाऱ्या मुलीच्या असहायतेमुळे 'भाकरीचा चंद्रच' कसा महत्त्वाचा ठरतो. सगळ्यांचे चंद्र छान जोडून शेवटी एकदम वास्तवात आणले आहे. काही तरी छान ऐकायला मिळाले, धन्यवाद. Happy

अनंत यात्री छान आहे खिडकी Happy

हपा, हो, अगदीच.
उजवीकडचा डावा भाग अजून मातीचा आहे. तिथे काय करतात ते कल्पना नाही. अजून काम चालूच आहे. तुकडे झाले मैदानाचे. पण आता वापर पुरेपूर होत आहे. मुले खेळताना दिसतात आता इथे दिवसरात्र. आधी रात्री नसायचे. पण आता लाईट्स आल्या.. त्यामुळे हॉकी फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल हे खेळ जोरात चालतात आता.
पण आधी सुट्टीच्या दिवशी शेजारची स्थानिक मुले क्रिकेट खेळायची. ते बंद झाले आता. म्हणजे मुले असतात तेव्हाही खेळताना. पण बाहेरची नाही.

त्या दिवशी लाईट गेली तेव्हा समजले की आता संध्याकाळचे अंधारात मेणबत्ती शोधायची गरज नाही.. पदडा उघडला की समोरून हा एवढा प्रकाश Happy

IMG_20240528_225509.jpg

ऋन्मेष, ही खिडकी नाही. ह्यासाठी - तुमच्या बाल्कनीच्या दारातून काय दिसते - असा धागा हवा. Happy

बाल्कनी पुढे.. पण तिथे जायला घर आणि बाल्कनी याना जोडणारी फुलंसाईज खिडकीच झाली की..
तरी नवा धागा हवा असेल तर काढायला काही हरकत नाही.. तुमच्या गच्चीवरून काय दिसते असाही काढू हवे तर Happy

सरांची भारी जादूची खिडकी. उभ्याचे आडवे आणि आडव्याचे उभे करणार. मुद्दाम केले आहे हे कळतंय. तेव्हढेच दोन प्रतिसाद जास्तीचे. प्लीज एडीट करू नका.

नेहमी ज्या मोकळ्या जागेतून फोटो काढतो तिथे पावसाच्या सरीवर सरी येतं होत्या. मोबाईल भिजत होता. म्हणून जिथे पाऊस पाण्यापासून संरक्षण करायला छज्जा मिळेल अश्या एका खिडकीच्या ग्रीलला एक हात पकडून लटकलो आणि दुसऱ्या हातात मोबाईल धरून, हात शक्य तिथे लांब करून, मी कुठेही असलो तरी मोबाईल योग्य जागी येईल असे बघून, टाईमर लाऊन, तसेच लटकलेल्या अवस्थेत काढलेला फोटो आहे... गोड मानून घ्या Happy

हे कुठल्या खिडकीतले दृश्य आहे अतरंगी..?

बाई दवे आजच योगायोगाने मी WhatsApp स्टेटस वर खिडकी आणि खिडकीतले दृश्य असे दोन फोटो शेअर केले. कारण छान हिरवेगार दृश्य नजरेस पडते हल्ली. जे माझ्या contact लिस्टमध्ये आहे ते तिथे बघू शकतात.. इतरांसाठी इथे नंतर शेअर करतो..

मातीचं घर बांधायला सुरुवात झाली आहे. खिडकी बसवायची आहे. पण जिथे बसणार आहे तिथून बाहेरची दृश्ये अशी दिसणार आहेत.
Screenshot_20240612_144334_Gallery_0.jpg

ओसरीतून असे दिसते दृश्य
Screenshot_20240612_144316_Gallery_0.jpg

हिरवळ वाढली...

IMG-20240708-WA0010.jpg
.
IMG-20240708-WA0012.jpg

चिकन विडो

IMG-20240708-WA0001.jpg

घर कि घरोबा?>>>>

Lol

घरच आहे हो….

मी फक्त नावाला अतरंगी आहे. तसा मी बराच सभ्य आहे. Happy

अतरंगी यांनी पहिला शेताचा जो फोटो टाकलाय तशा वातावरणात शेतात जाऊन जेवण्यात भरपूर मजा येते. सुकट भाकरी असेल तर अजूनच.

सुकट भाकरी असेल तर अजूनच..
>>>>>
सुकट भाकरी मला गर्दीने भरलेल्या एस्टीत खायला लावली तरी खाईन आवडीने .. तिच्या खिडकीच्या बाहेर जे दिसेल ते बघत बघत Happy

बाई दवे
योगायोग बघा.. नुकताच whatsapp status वर खिडकीतल्या शेताचा फोटो शेअर केला.. जो या धाग्याला सुद्धा लागू

IMG-20240708-WA0011.jpg

मातीचं घर बांधायला सुरुवात झाली आहे. खिडकी बसवायची आहे. पण जिथे बसणार आहे तिथून बाहेरची दृश्ये अशी दिसणार आहेत. >> रघु आचार्य. तुम्हाला विपु केली आहे.

Pages