खिडकी

Submitted by पाडस. on 30 September, 2018 - 11:00

आमच्या घरी एक होती खिडकी,
बाकी सगळे ठीक एक दात पडकी.

उगीचच मला बघून हसायची,
मी पडदा लावला कि मग गाल फुगवून बसायची.

दिवस रात्र ती काहीना काही बोलायची,
ऊन,वारा,पाऊस सार तीच झेलायची.

उन्हाची किरणं हळूच आत पाठवायची,
मला उशीर झाला कि हमखास तीच उठवायची.

बघाव म्हटलं बाहेर कि, तिचा एक दरवाजा खोलायचो,
तिझ्याशीच बसून मी सार मनातलं बोलायचो.

एक दिवस मग ती मला बघून हसलीच नाही,
तिची ती दात पडकी मुद्रा मला दिसलीच नाही.

कारण, तिला सोडून आम्ही दुसरीकडे जाणार होतो,
तिलाही माहित होत परतून कधीच न येणार होतो.

जाता-जाता एव्हढच म्हणाली,
"बाळा जाशील कुठंही, पण आठवण तरी ठेवशील कि नाही"

आता कधीतरी जातो त्याच वाटेवरून,
तेंव्हा दिसते तीच खिडकी.

बघून हसत नाही पण आहे तशीच आहे,
एक दात पडकी.......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults