कित्येक वर्षांपूर्वी अगदी ऐन पावसाळ्यात लोणावळा-खंडाळ्याला गेले होते. धुक्यात लपलेले ते हिरवेगार डोंगर, पावसात न्हाऊन पानोपानी प्रफुल्लीत झालेली ती झाडे, हिरव्यागार डोंगरामधून कोसळणारे ते पांढऱ्याशुभ्र पाण्याचे प्रपात. ह्या अशा स्वर्गीय म्हणावं अशा मनोरम निसर्गदृश्याकडे पाहतांना मला काही क्षण अक्षरश: असुरक्षित वाटलं. ह्या सगळ्या असीम सौंदर्याचा फक्त आस्वाद घेण्याची सुद्धा क्षमता आपल्याजवळ नाही. ह्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली पंचेद्रियांची झोळी फाटकी आहे आहे, असे काहीसे विचार मनात येऊन गेले. आपल्या क्षुद्र असण्याची जाणीव नव्याने अस्वथ्य करुन गेली. त्याच मूड मध्ये कुणा जवळच्याला लिहिल्या गेलं, आणि त्याच्या सहज उत्तरातलं वाक्य माझी अनेक वर्ष सोबत करतंय, “अगं आपण त्यातलाच एक भाग नाहीये कां? मग तिथे जाऊन, त्या मनोरम निसर्गचित्राचाच एक भाग होऊन ते अनुभवणं, म्हणजेच त्या सौंदर्याचा आस्वाद घेणं”.
आणि त्यानंतर जिथे शक्य होईल तिथे असे आस्वादाचे क्षण वेचायची नकळत सवय लागली.
ह्या क्षणांना सृष्टीची सगळी कडी एकमेकांत गुंफुन एक सलग आकृतीबंध जाणवतो आणि आपण त्यातली एक कडी होऊन बसतो. अर्थात यात आवर्जून करण्यासारखं काहीच नसल्यामुळे हा सगळा अनपेक्षित आनंदाचाच भाग असतो.
ह्या शोधप्रवासात जसे शब्दात नेमके न पकडता न येणारे, पण ती एकरुपता अनुभवलेले क्षण सापडतात, तसेच सगळ्या आवश्यक गोष्टी असूनही काही अबोध कारणांमुळे काही एकरुपतेचे क्षण अलगद हातातून निसटतात. माझ्या बऱ्याचशा निराशावादी स्वभावाचा परिणाम म्हणून की काय मी ते निसटलेले क्षणही मनात कुठेतरी पकडून ठेवलेय, त्यातलाच हा एक.
स्थळ: आता निसर्गाच्या बाबतीत काय डावं-उजवं काय करणार, तेव्हा एक अगदी दाट झाडीत लपलेला नदीकाठ आणि वेळ? वेळ रेंगाळण्याची. पाण्याचा खळखळाट आणि अधूनमधून पक्ष्यांचा आवाज, या पलिकडे कसलाही आवाज नाही, चाहूल नाही, बाहेरच्या जगाशी जोडणारा काही म्हणता काही दुवा नाही. त्या नदी काठावर बॅगपॅक काढून संथपणे आजूबाजूला झाडांकडे, जमिनीवर गळुन पडलेल्या वाळलेल्या पानांकडे, इतस्तत: पडलेल्या दगडांकडे, नदीच्या पाण्याकडे निर्हेतुकपणे पाहत बसले.
शंकर वैद्य म्हणतात तसं: शांततेत ऊभे माझे निवांत एकटेपण! इथे मी बसले होते
पाण्यामध्ये हळूहळू उतरत जावे तशी ती नीरवता मनामध्ये अलगद उतरत होती. आणि अचानक माझ्या मनाला बाहेरच्या जगाची चाहूल लागली. आणि त्या सबंधित अनेक विचारांचे भुंगे मनात घोंघावू लागले आणि झालं. प्रत्यक्षात काहीही न घडता मला एकदम त्या निसर्गचित्रात उपरे वाटू लागले. ती झाडे, ती पाने, ते नदीचे पाणी, ते दगड, पक्षांचे आवाज … सगळे कसे परके वाटायला लागले. बाहेरच्या जगाबद्दलच्या विचारांनी जणू माझा त्या एकरुपतेच्या क्षणांपर्यंत पोचण्याचा मार्गच खाऊन टाकला. आता आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टीवरची माझी नजर निर्हेतुक राहीली नव्हती तिला व्यवहाराचा स्पर्श झाला होता.
मी ही हा बदल निमूटपणे स्वीकारला. ह्या निसटलेल्या क्षणांना बरोबर घेऊनच केलेल्या प्रवासातच माझ्या अनेक आधीच्या आणि पुढे असणाऱ्या एकरुपतेच्या क्षणांचे अस्तित्व रुजले होते.
फारच छान... शेवट आवडला.
फारच छान... शेवट आवडला.
सुंदर लिहिलं आहेस.
सुंदर लिहिलं आहेस.
>>> ह्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली पंचेद्रियांची झोळी फाटकी आहे आहे
>>> सृष्टीची सगळी कडी एकमेकांत गुंफुन एक सलग आकृतीबंध जाणवतो आणि आपण त्यातली एक कडी होऊन बसतो
>>> वेळ? वेळ रेंगाळण्याची
छोटंसं गद्यकाव्यच झालंय हे!
आवडले.
आवडले.
कडी शब्दास अडखळले. हा प्रतिसाद आवडला नसल्यास माफ करा.
व्यावहारिक चिंता आणि
व्यावहारिक चिंता आणि घईगडबडीचे गालबोट लागते खरे. पण अंधार आहे म्हणुन प्रकाशास महत्व आहे.
व्यावहारिक चिंता आणि
व्यावहारिक चिंता आणि घईगडबडीचे गालबोट लागते खरे. पण अंधार आहे म्हणुन प्रकाशास महत्व आहे.
छान आणि विचारात पाडणारं
छान आणि विचारात पाडणारं लिहिलं आहे.
ही आपण क्षुद्र असण्याची जाणिव मला निसर्गात अनेकदा होते आणि प्रवासात वेगळ्या शहरांत, वेगळ्या परिसंस्थेत गेलं की सुद्धा फार होते. विमानतळावर, विद्यापिठांत, इस्पितळात, शाळेत, प्रोव्हिंशिअल पार्कमध्ये, ट्रेलवर इतकं कशाला! काल घरासमोरच्या रस्त्यावरचा स्नो चा डोंगर महानगरपालिकेने उचलून नेला तेव्हा ही, हेच उपरं - लेफ्ट आऊट फिलिंग काही काळ आलंच. किती विविध प्रकारची सात आठ स्वयंचलित उपकरणं एकामागोमाग एक आली. लयबद्ध प्रकारे दोन्ही बाजुंचा स्नोचा ढीग उचलला, परत रस्ता साफ करुन पंधरा मिनिटांत मार्गस्थ.
त्यांचा सालाबाद फोटो काढून त्यांना बाहेर पडून दुरूनच हाताने खुणावण्यापुरता माझा संबंध.
हे असं वरच्या आणि इतर अनेक परिसंस्थांत गेल्यावर कायम वाटतं. किती लयबद्ध सगळं चालू आहे. आपण काही तासांत फक्त मार्गस्थ होण्यापुरते विमानतळावर थांबतो, पण तिकडेही विविध विक्रेते, जमिनीवरुन ने आण करणार्या बसेस, ट्राम, सरकते जिने, उद्वाहक, स्वच्छतागृहे, खानपानसेवा, उड्डाणापूर्वी काही काळच उघडून आपल्याला मार्गस्थ करवून देऊन दुसर्या फाटकाशी जाणारा विमानतळावरील कर्मचारी वर्ग, उशीर होणार्या, रद्द होणार्या विमानफेर्या, असं झालं की त्या उतारुंची विश्रामगृहात रहायची सोय, भाड्याने वाहनदेण्यार्या कंपन्या, बसेस, आगगाड्या, एक ना दोन विचार करू तितकं मन फक्त सैरभैर होतं.
आपण को?? कुठले? पांथस्थ. यापुढे आपण ही त्यातलेच की! हा विचार नक्की साथ करेल.
वेळ रेंगाळण्याची. >>> वाह! हे
वेळ रेंगाळण्याची. >>> वाह! हे आवडलंच
लेख भिडला. हे असं कितीतरी वेळा वाटून गेलंय. उत्तम शब्दबद्ध केलं आहेस.
लेख अप्रतिम उमटलाय
लेख अप्रतिम उमटलाय
लेख तर आवडलाच पण "आपणही
लेख तर आवडलाच पण "आपणही त्याचाच एक भाग आहोत" ही जाणीव पुढेही जेव्हा एखाद्या भव्य निसर्गदृष्यासमोर उभा असेन तेव्हा होईल आणि त्याची वेगळीच अनुभूती देईल!
सुंदर लिहीले आहे!
छान लिहिले आहे...
छान लिहिले आहे...
निसर्गात गवसलेले आणि निसटलेले क्षणच वेगळी अनुभूती देऊन जातात.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
स्वर्गीय.. सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली पंचेद्रियांची झोळी फाटकी आहे आहे, >>> +1
खूप सुंदर लिहिलंय..
खूप सुंदर लिहिलंय..
ह्या सगळ्या असीम सौंदर्याचा फक्त आस्वाद घेण्याची सुद्धा क्षमता आपल्याजवळ नाही. ह्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली पंचेद्रियांची झोळी फाटकी आहे आहे, असे काहीसे विचार मनात येऊन गेले. आपल्या क्षुद्र असण्याची जाणीव नव्याने अस्वथ्य करुन गेली. <<
असं कवितेबद्दल (कथा, कादंबरी, चित्रपट.. बरंच काही) मला जाणवतं.
काही अन्य लोकांना कळलेली कविता आणि त्यामानाने मला जरा बर्यापैकी कळलेलं काही याच्या आनंदाबरोबरच (आनंद त्यांना कमी कळलं किंवा त्यांच्यापेक्षा अधिक कळलं म्हणून नाही.. तर मला अधिक कळू शकतं/कळण्याची क्षमता आहे.. म्हणून ) असाच फरक माझ्या कळण्यात आणि अधिकची, त्याहून अधिकची आकलनशक्ती, आस्वादक क्षमता असलेल्या अनामिक लोकांबद्दल विचार करुन थोडसं दुःख होतं. (परत, दुःख त्यांना जास्त कळलं म्हणून नाही तर तसा आस्वाद, आकलन मला न झाल्यामुळे [नेमका कसला, कुठला ते ही माहित नाही] ती क्षमता नसू शकल्याबद्दल)
पण त्याचवेळेस मला हे ही वाटतं की मला देवाने/निसर्गाने निदान एवढं तरी जाणण्याची, अनुभव घेण्याची आकलनाची क्षमता दिली आहे.
मी जे रंगीत निसर्गदृश्य पहातो ते माझ्यासोबतच्या कुत्र्याला काळ्या, करड्या आणि ठराविक रंगाधळ्या छटांमधेच दिसत असतं. मग हे जे मला काही जास्त चांगलं दिसतंय त्याबद्दल मी आनंदी आणि त्याच बरोबरीने कृतज्ञ असायला पाहिजे.
ही जाणिव मला माझा आनंद परत मिळवून देते, वाढवते..
(अन्यथा कुत्र्यांची घ्राणेंद्रिय क्षमता, गरुडाची दृष्टी... अशा किती आणि कशाकशाची मी खंत करु..?)
धन्यवाद, मनीमोहोर, स्वाती,
धन्यवाद, मनीमोहोर, स्वाती, सामो, अमित, रूपा, कविन, फारएण्ड, ऋतुराज, सिमरन, अनिरुद्ध !!
तुम्ही वाचून आवर्जून प्रतिक्रिया दिली, म्हणून खुप बरं वाटलं. हुरुप आला.