कणेकरांची "माझी फिल्लमबाजी* परिचित आहेच, ह्या धाग्याच फक्त शीर्षक त्यावरून घेतल आहे, पण हा धागा फिल्म फोटोग्राफीशी (चित्रफित प्रकाशचित्रण) संबंधित आहे. सध्या मोबाईल कॅमेरा च्या युगात फिल्म फोटोग्राफी पुरातन काळातील गोष्ट वाटेल. पण माझ्या सारखे कूणी हौशी असतील, त्यांच्या कडे काही जुने/नवे फोटो, फिल्म कॅमेरा ने काढलेले असतील तर ती प्रदर्शित करता यावी तसच त्याबद्दल चर्चा व्हावी ह्या हेतूने हा धागा सुरु करत आहे.
ह्या भागात फिल्म कॅमेरा बरोबर मॅक्रो लेन्स वापरून काढलेली प्रकाशचित्र पोस्ट करत आहे.
तू फूल कुणाचे देखणे
नको उन्हात हासत थांबू ...
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून तुझिया देशा!
रुजताना होईल अंत
नसेल कोणास खंत
तू जीव कुणा मायेचा
जा निघून हलक्या पायी ....
तू फूल कुणाचे देखणे
नको उन्हात हासत थांबू .....
-शिवकन्या
शोधायाला फूल सुगंधी गेलो होतो रानी
दगडावरती बसलेला तो दिसला डोडो ज्ञानी
मला पाहुनी हळूच हसला, "बैस इथे" वदला
आनंदाने मीही सादर वंदन केले त्याला.
(डोडोचा प्रश्न)
. . . "देशिल मजला उत्तर जर तू एका प्रश्नाचे,
. . . फूल सुगंधी देईन तुजला सुंदर रंगाचे.
. . . उंच फेकले फळ हे जरी मी, खाली ते येते,
. . . सांग मला तू झटकन आता, असे कसे ते होते ?"
(माझं उत्तर)
"नियम असती ठाऊक मजला सगळे न्यूटनचे,
गुरुत्वीय ते बल रे आहे कारण ह्यामागचे."
अचूक माझे उत्तर ऐकुनि प्रसन्न डोडो झाला,
झाडावरचे फूल सुगंधी मजला देता झाला...
. . . . . (डोडो हा मॉरिशसचा राष्ट्रीय पक्षी आहे.)
मित्रहो, मी काही सुर्यफुलांची प्रकाशचित्र देत आहे. आवडल्यास जरूर प्रतिसाद द्या. फोटो अपलोड करण्याचि सोपी युक्ती सांगीतल्या बद्दल जिप्सीला धन्यवाद.
१.
२.
३.
४.