डोडो

Submitted by समीर देसाई on 3 October, 2016 - 00:50

शोधायाला फूल सुगंधी गेलो होतो रानी
दगडावरती बसलेला तो दिसला डोडो ज्ञानी
मला पाहुनी हळूच हसला, "बैस इथे" वदला
आनंदाने मीही सादर वंदन केले त्याला.
(डोडोचा प्रश्न)
. . . "देशिल मजला उत्तर जर तू एका प्रश्नाचे,
. . . फूल सुगंधी देईन तुजला सुंदर रंगाचे.
. . . उंच फेकले फळ हे जरी मी, खाली ते येते,
. . . सांग मला तू झटकन आता, असे कसे ते होते ?"
(माझं उत्तर)
"नियम असती ठाऊक मजला सगळे न्यूटनचे,
गुरुत्वीय ते बल रे आहे कारण ह्यामागचे."
अचूक माझे उत्तर ऐकुनि प्रसन्न डोडो झाला,
झाडावरचे फूल सुगंधी मजला देता झाला...
. . . . . (डोडो हा मॉरिशसचा राष्ट्रीय पक्षी आहे.)
http://supetsamir.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users