मभागौदि २०२५: निसर्गायण

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 17 February, 2025 - 04:49

मभागौदि २०२५: निसर्गायण

"नितराम् सृजति इति निसर्ग:" जो सर्वांगाने सर्जनशील असतो तो निसर्ग.

मनुष्याचे निसर्गाशी आदिमकाळापासून एक अतूट नाते आहे. खरं तर निसर्ग आपल्या संस्कृतीचा आदिम स्रोत आहे. जगातील कोणत्याही संस्कृतीचा उगम आणि भरभराट निसर्गाच्या सानिध्यातच होत असतात. मानवी भावना देखील निसर्गाच्या सानिध्यात अधिक उचंबळून येतात.

वाहणारा वारा, अथांग पसरलेला समुद्र, आकाशातील सूर्य, चंद्र, तारे ; भरून आलेले आभाळ, काळी आई, डोलणारी शेते, झुळझुळणारं पाणी, वाहणाऱ्या नद्या, बदलणारे ऋतू, आजूबाजूची गर्द हिरवाई, दाट जंगले, डोंगरदऱ्या,असंख्य पशुपक्षी, कीटक, रंगीबेरंगी फुलेपाने. या आणि यासारख्या असंख्य रूपांतून दररोज आपल्याला निसर्गाचे एक नित्यनवे रूप दिसत असते.

आपल्या मराठी भाषेत बालकवी, बा भ बोरकर, कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, ना धों महानोर, मारुती चितमपल्ली या आणि यांसारख्या अनेक प्रतिभावंत कवी आणि लेखकांनी या निसर्गावर भरभरून लिहिले आहे आणि मराठी साहित्य समृद्ध केले आहे.

या वर्षीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण निसर्गविषयक लेख, कविता, अनुभव, निसर्ग भ्रमंती वर्णन ; तुम्हाला आवडणारे निसर्गविषयक मराठी पुस्तक, किंवा निसर्गावर लिहिणारे लेखक, कवी यांविषयी लिहायचे आहे.

हा उपक्रम आहे. स्पर्धा नाही.

नियम व अटी -

१. निसर्गविषयक लेख, कविता, अनुभव, निसर्ग भ्रमंती वर्णन, तुम्हाला आवडणारे निसर्गविषय मराठी पुस्तक, निसर्गावर लिहिणारे लेखक- कवी यांविषयी लिहावे. लेखन कोठेही पूर्वप्रकाशित नसावे.

२. 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे.

३. धाग्याचे नाव मभागौदि २०२५- निसर्गायण - शीर्षक - मायबोली सदस्यनाम किंवा खरे नाव (ऐच्छिक) अशा प्रकारे द्यावे. शब्दखुणांमध्ये उपक्रमाचे नाव "मभागौदि निसर्गायण" असे लिहावे.

४. एक सभासद एकापेक्षा अधिक प्रवेशिका देऊ शकतो.

५. प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत - अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गायण मध्ये
फळं, फुलं, पानं, पर्वत यांच्यावर बेतलेले हे आधीचे पाच लेख.

पानगळतीच्या ऋतु मधील रंगांची उधळण...
https://www.maayboli.com/node/82630

वसंतऋतु मधे बहरणारी फळांची फुले ..
https://www.maayboli.com/node/83139

ड्रॅगन फ्रूट च एकाच रात्रीपुरतं उगवणार, ब्रम्हकमळसारखं दिसणार शुभ्र फुल..
https://www.maayboli.com/node/83279

सुसह्य आणि सुखद (?) उन्हाळ्यातील, राजेशाही माउंट रेनिअर ..
https://www.maayboli.com/node/83864

ज्याच्या तुषारांनी बनलेल्या पडद्यावर १८० अंशाहून ही मोठे इंद्रधनुष्य दिसते, असा वेड लावणारा नायगरा धबधबा..

https://www.maayboli.com/node/82166