फुलपाखरांचे स्थलांतर : एक नयनरम्य सोहळा
Submitted by समीर गुळवणे on 16 February, 2019 - 12:34
सुमारे ऐंशी वर्षापूर्वी डॉ फ्रेड अर्कहार्ट या एका कॅनेडियन संशोधकाने मोनार्क या अतिशय सुंदर व नावाला अनुरूप, राजबिंड्या फुलपाखरांचा अभ्यास सुरु केला. कडाक्याच्या थंडीत ही फुलपाखरे कुठे जातात? हा लहानपणापासून त्याला पडलेला प्रश्न! कीटक विषयात डॉक्टरेट मिळवून त्यांनी व त्यांच्या पत्नी नोराह यांनी या फुलपाखरांच्या स्थलांतराचा शोध चालू ठेवला. फुलपाखरांच्या एकत्र येण्याबद्दल ब्रिटिश कीटक शास्त्रज्ञ सी.बी. विल्यम यांनी १९३० मध्ये एक पुस्तक लिहिले होते. पण मोनार्क फुलपाखरे कॅनडा व अमेरिकेतून थंडीच्या ऋतूत नक्की जातात कुठे? हे गूढ उकलले नव्हते.