आज बातमी वाचली कुनो नॅशनल पार्क मधे अजून एका चित्त्याने, सुरजने, मान टाकली. या आठवड्यातली अशी दुसरी बातमी आहे.
https://indianexpress.com/article/india/eighth-cheetah-dies-at-kuno-nati...
सप्टेंबर २०२२ मधे, खास विमानाने (B747) नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले. पुढे, दुसर्या फेरित, द. अफ्रिकेमधून, बारा चित्यांची त्यात भर टाकण्यात आली. या विस चित्त्यांना कुनो नॅशनल पार्क, मध्य प्रदेश, मधे ठेवण्यात आले. एका मादी चित्त्याने भारतात आल्यावर चार बछड्यांचा जन्म दिला, त्यापैकी तिन गेले असे एकूण आठ चित्यांची आतापर्यंत प्राणज्योत मालवली आहे.
आज सबंध जगांत केवळ ७००० चित्ते असावेत, हे बहुतांश अफ्रिकेत आहेत आणि प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भारतातले चित्ते १९५२ च्या आसपास नामशेष झाले होते. १९७० चित्त्यांची आयात करावी असा विचार झाला होता. चित्त्यांची निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याच्या उद्देशाने " प्रोजेक्ट चित्ता " ला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता २०२० मधे मिळाली.
अशा प्रकारचे स्थलांतर फार मोठे आहे. थोडे मागे डोकावल्यावर सम्राट अकबराकडे १००० चित्ते होते, काळाच्या ओघांत ते सर्व नामशेष झाले. १९१८ - १९४५ दरम्यात २०० चित्ते आयात करण्यात आले (असे सकाळ मधे वाचले). ते १९५२ पर्यंत नामशेष झाले.
प्रजाती निर्माण होणे - नष्ट होणे हा निसर्गाचा भाग आहे. पृथ्वीवर नक्की किती प्रजाती निर्माण - नष्ट झाल्या हे नक्की सांगता येणार नाही. जीवाश्म / उत्क्रांतीचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आजपर्यंत निर्माण झालेल्या प्रजातींपैकी ९९.९ % प्रजाती नष्ट झाल्या आहेत. एखादी प्रजाती टिकवायची आहे म्हणून चित्त्यांना अफ्रिकेमधून भारतात आणणे हे सक्तीचे स्थलांतर झाले, आणि असे स्थलांतर निसर्गाला मान्य असेलच असे नाही.
हे चित्ते (अनेक पिढ्यांत ) अन्नासाठी भरकटत भरकटत आले असते - तर तो टप्या टप्प्यातला बदल म्हणजे नैसर्गिक बदल ठरला असता. ८००० किमी विमानाने, स्थलांतर करणे हा अनैसर्गिक, कृतिम आणि अचानक फार मोठा बदल झाला. एव्हढा मोठा वातावरणांतला बदल ( अफ्रिका - ते - भारत) या प्रजातीला मानवेल का याबाबत काही सखोल अभ्यास होणे गरजेचे होते का? अभ्यास म्हणजे निव्वळ तापमान, आद्रता, फिरण्यासाठी सुरक्षित वातावरण, खाण्याची बडदास्त एव्हढ्यापुरतेच मर्यादित नाही - काही तरी चुकत आहे.
पर्यावरण, स्थलांतर या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे.
आपली दोन केअर टेकर माणसे तिथे
आपली दोन केअर टेकर माणसे तिथे जाऊन राहून आली असती आणि तर? ते चित्ते तिकडे खरंच वनात होते का? मुक्त जगत होते का? का त्यांना रेडी अन्न दिले जात होते?
https://www.telegraphindia
https://www.telegraphindia.com/india/wildlife-veterinarians-blames-neck-...
चित्त्यांची हवं.
चित्त्यांची हवं.
राजेसाहेबांनी चित्ते अभयारण्यात सोडून वाढदिवस साजरा केला होता.
National Tiger Conservation Authority म्हणतेय चित्ते नैसर्गिक कारणाने मेले. तज्ज्ञ असहमत आहेत.
https://www.telegraphindia.com/india/indian-wildlife-authorities-attribu...
राजेसाहेबांनी चित्ते
राजेसाहेबांनी चित्ते अभयारण्यात सोडून वाढदिवस साजरा केला होता.>>
हे एकच कारण पुरेसे आहे.
आठवा ब्लॅॅक कॅॅट!
चित्त्यांना झालेल्या
चित्त्यांना झालेल्या जखमा
https://twitter.com/GargiRawat/status/1681225307796242432
कुनो नॅशनल पार्क मधे आज आणखी
कुनो नॅशनल पार्क मधे आज आणखी एका मादि चित्त्याने जगाचा निरोप घेतला.
एकंदर ९ चित्ते गेले आहेत, एव्हढे मोठे स्थलांतर करण्यापूर्वी कुठलाही अभ्यास केलेला नव्हता.
या प्रोजेक्टशी संबंधित द
या प्रोजेक्टशी संबंधित द आफ्रिका आणि नामिबियातील तज्ज्ञ म्हणतात the project’s current management has “little or no scientific training;” the foreign experts’ “opinions” are being “ignored;” they “had to beg for information” and they “have become mere window dressing” for the project.
त्या चित्त्यांना लावलेल्या कॉलर्समध्ये भारतीय वातावरणातील आर्द्रतेमुळे कीटक व जंतूंचा प्रादुर्भाव होऊन चित्त्यांना जखमा होतात आणि त्या जिवावर बेततात. पहिल्याच मृत चि त्त्याचे फोटो , रिपोर्ट्स या तज्ज्ञांना पाहता आले असते तर त्यांना कारण कळले असते, उपाय सांगता आले असते.
उलट प्रोजेक्ट हँडल करणारे अधिकारी आमचा डेथ रेट कमीच आहे असलं काय काय सांगताहेत.
आधुनिक महम्मद तुघलक!
आधुनिक महम्मद तुघलक!
शौर्य गेला.... https:/
शौर्य गेला....
https://timesofindia.indiatimes.com/city/bhopal/sudden-death-for-cheetah...
मागच्या महिन्यात आशाने तसेच काही दिवसांपूर्वी ज्वालाने प्रत्येकी तीन बछड्यांना जन्म दिला.
https://www.esakal.com/desh/mp-kuno-national-park-news-female-cheetah-jw...