व्हीडीयो

कॅनडा गीझ : स्थलांतर व्हीडीयो (Migration of Canada Geese)

Submitted by rar on 23 November, 2015 - 14:11

नोव्हेंबरच्या दुसर्‍या - तिसर्‍या आठवड्यात आकाशात काळ्या-पांढर्या रंगाचे पट्टे उमटायला लागतात आणि अचानक कॅनडा गीझचा आवाज आसमंत भरून टाकायला लागतो. कॅनडाहून दक्षिणेला प्रयाण करणारे हे कॅनडा गीझ मजल दरमजल प्रवास करताना काही काळासाठी आपल्या भागात मुक्कामाला आल्याची जाणीव होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या पक्षांचं चाललेलं ट्रेनिंग पाहणं हा विलक्षण अनुभव. त्यांचं एकत्र येणं, विविध गट करणं, आवाजातून आणि पंख फडफडवून संदेश देणं, फिजीकल कपॅसीटी आणि वयानुसार वेगवेगळे ग्रुप्स करून सगळ्यांना एकत्र घेऊन उड्डाण करणं हे सगळंच अचंबित करणारं.

Subscribe to RSS - व्हीडीयो