स्थलांतर

स्थलांतर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

स्थलांतर

पोटाची खळगी भरण्यासाठी
पाखरांचे थवे उडत गेले
माणसांचे जथ्थे वाहत गेले
प्राण्यांचे कळप भटकत गेले
फुलाफळातले बीज रुजत गेले
या बेटावरुन त्या बेटावर...

चिमणी घरटी ओस पडली
भरले संसार रिकामे झाले
जंगलांचे रानटीपण हरवले
ओल्या भुईची माती होऊन
एक बेट उजाड झाले आणि
दुसर्‍या बेटावर उजाळले...

गात गात पाखरे आली
बायामाणसे नाचत आली
श्वापदांचे आवाज घुमले
दरवळ घेऊन ऋतुं आले
सुक्या मातीतून सोने उगवले

जणू बेट बेटावर स्थलांतरीत झाले...

- बी

प्रकार: 
शब्दखुणा: 

CA to NY move करायच आहे, सामान move कस करायचं?

Submitted by sas on 12 September, 2008 - 22:04

मदत हवी आहे:

मला CA to NY move करायच आहे, सामान move कस करायच हा प्रश्न आहे, कुणी मदत करेल काय please?

Rent ची गाडी करुन त्यात सामन नेण, याशिवाय दुसरा काही मार्ग आहे का सामान move करण्याचा?

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - स्थलांतर