स्थलांतर

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

स्थलांतर

पोटाची खळगी भरण्यासाठी
पाखरांचे थवे उडत गेले
माणसांचे जथ्थे वाहत गेले
प्राण्यांचे कळप भटकत गेले
फुलाफळातले बीज रुजत गेले
या बेटावरुन त्या बेटावर...

चिमणी घरटी ओस पडली
भरले संसार रिकामे झाले
जंगलांचे रानटीपण हरवले
ओल्या भुईची माती होऊन
एक बेट उजाड झाले आणि
दुसर्‍या बेटावर उजाळले...

गात गात पाखरे आली
बायामाणसे नाचत आली
श्वापदांचे आवाज घुमले
दरवळ घेऊन ऋतुं आले
सुक्या मातीतून सोने उगवले

जणू बेट बेटावर स्थलांतरीत झाले...

- बी

प्रकार: 
शब्दखुणा: 

बी छान आहे कविता. एक छोटी अ‍ॅनिमेशन फिल्म बनेल. तुझे नेस्टिंग इन्स्टिंक्ट्स जाग्रुत झाले आहेत का?
लाडू कधी ते?