मृत्युदाखला कसा मिळवावा?

Submitted by अन्नपूर्णा on 8 September, 2020 - 07:30

वडिलोपार्जित जमिनीचा वारस तपास करण्यासाठी, एखाद्या मयत नातेवाईकाचा मृत्युदाखला हवा असेल तर तो Online मिळवता येतो का? येत असल्यास त्यासाठी प्रक्रिया काय आहे ? त्यांच्या मृत्यूची नोंद जाणून घेता येईल का? कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑन लाईन बहुदा नाही

मृत्यू सर्टिफिकेट डॉकटर देतात , ते मुन्शीपालतीत जमा केल्यावर ते देतात

मृत्यू कुठे झाला आणि दहन

मृत्यू कुठे झाला आणि दहन कुठे केले त्यावर अवलंबुन आहे. जर पुण्या - मुंबईत गेल्या १०-१५ वर्षात झाला असेल तर त्याची नोंद केल्याशिवाय दहन होत नाही. तेच जर आपल्या शेतात दहन केले असेल तर मृत्यू सर्टिफिकेट / दाखला असेलच असे सांगता येत नाही.

ज्या महापालिका (किंवा नगरपालिका / ग्रामपंचायत ) हद्दीत मृत्यू झाला त्या. महापलिकेकडुन मृत्युदाखला मिळतो. उदा समजा पुण्यात मृत्यू झाला तर पुण्यातिल डॉक्टर / हॉस्पिटल कडुन मृत्यू सर्टिफिकेट घेतले जाते आणि दाखला पण पुण्यात मिळतो जरी मुंबईत दहन केले तरी .

ऑन लाईन सर्विस साठी National Government Service Portal आहे. पण चालु झाले आहे का ते माहित नाही

मी नगरपरिषदेतून दाखला घेतला होता (कारण मयत त्या गावात झाली होती) तर माझ्या तिथल्या अनुभवानुसार सगळ्यात महत्त्वाचं डॉ. च सर्टिफिकेट च आहे. आणि ते द्यायला डॉ थोडं का कूं करतात.
तरी जन्म-मृत्यू चे दाखले त्वरीत घ्यावे, त्याशिवाय पुढे कुठलेच पेपर हलत नाहीत.
किमान ५/५ कॉपीज् घाव्या. लागतातच.

त्या मयत नातेवाइकाच्या मुला/मुली/ बायकोकडे असणारच. त्यांच्याकडूनच घ्यावा लागेल.>>
त्यांच्यापैकी कोणीही संपर्कात नाहीये. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करणे हा शेवटचा पर्याय असू शकतो. त्याखेरीज काही मार्ग निघेल का याची पडताळणी करत आहे.

तेच म्हणतो मी

मृताचे जवळचे नातेवाईक , ज्यांनी मृत्यू नोंदवला त्यांनाच मृत्यू दाखला मिळणार

वारस तपासण्यासाठी म्हणजे जमिनीवर कोणाकोणाची नावे यायला हवीत व कोणाची सध्या आहेत हे बघण्यासाठी व ज्यांची यायला हवीत पण सध्या नाहीयेत त्यांची चढविण्यासाठी असेल बहुतेक. त्यासाठी ज्याचे नाव आधी होते/सध्या आहे त्याचा मृत्यूदाखला लागणार. गावी मृत्यू झाला असेल तर ग्रामपंचायतीत जावे लागणार/त्यांच्याकडून वंशावळ घ्यावी लागणार. आणि तिथे जाऊन चौकशी केली की ज्यांना कळायला नको असे आपल्याला वाटते त्यांनाही कळणार.

प्राईम डॉक्युमेंट आहे ते. समजा ते ओनलाईन डाउनलोड केलंत तरी ओरजिनल दाखवावे लागेलच.
---------------
प्राईम डॉक्युमेंटस यावर धागा हवा.

तुम्ही विस्ताराने दिले असते तर व्यवस्थित सुचवता आले असते तरी माझ्या थोड्या माहितीप्रमाणे सांगतोय. वंशावळ तयार ठेवा. जमिनीच्या मालकांची सातबाऱ्यावर नोंद असते. त्या जमिनीचा गट क्रमांक/सर्वे क्रमांक माहिती करून घ्या. त्यावरून तहसील कार्यालयातून आधीचे सर्व फेरफार मिळवा. ते ऑनलाइनबी मिळतात पण तहसीलमधून साक्षांकित झेरॉक्सचा बंच मिळेल. वडिलोपार्जित जमिनीचा वारस तपास करण्यासाठी, एखाद्या मयत नातेवाईकाचा मृत्युदाखला मिळवण्याची गरज नसून ह्या फेरफारची गरज आहे. फेरफारमधे कोणाकडे कशी जमीन हस्तांतरित झाली याचे रेकॉर्ड असतात. कायद्यानुसार त्या मयताचा या जमिनीवर हक्क असेल आणि त्याचे नाव उताऱ्यावर नसेल तर तुम्ही कायदेशीर वकिलाचा सल्ला घेऊन पुढची प्रक्रिया सुरु करा. ग्रामपंचायतीमध्ये मृत्यु झाल्यावर नोंद केली असेलच तिथे हा दाखला त्याच्या वारसांना मिळतो. ह्या दाखला -फेरफार गोष्टी "वेगळ्या" मार्गाने जलद होऊ शकतात. पुढे कोर्टातपण वेळ जाणारच.
उतारे आणि फेरफार हे ऑनलाईन मिळतात.
मृत्यूचा दाखला ऑनलाईन नाही मिळवला कधी पण इथे पाहू शकता -
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?Ser...

तलाठी रोज उपलब्ध नसतो ग्रामपंचायतीत त्यामुळे तो कोणत्या दिवशी असतो ती चौकशी करून जा नाहीतर फुकट हेलपाटे पडतील.

वारस तपसण्या साठी मृत्यू चा दाखल कशाला हवा.
मृत्यू झालाय हे तरी तुम्हाला कन्फर्म माहीत आहे का.
ते सुद्धा ऑनलाईन चेक करून तपासत आहात.

तो पहिला मार्ग नको का?
डेथसर्टीफिकेट असं तिर्‍हाईताला का द्यावं कोणी?>>
अगदीच तिऱ्हाईत नाही, रक्ताचं नातंच आहे, परंतू गेल्या अनेक वर्षात त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. आणि आता फक्त या कारणासाठी संपर्कात येणं जरा अवघड वाटतंय.

मृत्यू झालाय हे तरी तुम्हाला कन्फर्म माहीत आहे का.
ते सुद्धा ऑनलाईन चेक करून तपासत आहात.>> हो कन्फर्म आहे.

BLACKCAT, साहिल शहा, INDIAN1, Srd, अमितव, आग्या१९९०, साधना, जिद्दु, Hemant 33 प्रतिसादासाठी धन्यवाद.

मृत्यू नंतर त्या व्यक्तीचे कायदेशीर वारस आहेत त्यांची नावं प्रॉपर्टी कार्ड वर लागतात.
कायदेशीर वारस हे .
मुल,मुली,आणि बायको हेच असतात.
मुलीची मुल वारस म्हणून direct वारस ठरू शकणार नाहीत .

मला वाटते तुम्ही मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातलगांशी संपर्क करून मग पुढची पावले उचलावीत. जर इतक्या वर्षांत काहीच संबंध उरले नसतील आणि त्यांना तुम्ही असे काही प्रयत्न करत आहात हे दुसरीकडून कुठूनतरी कळले (जे कळतेच!) तर तुमचे संबंध उगीच wrong footing वर सुरू होतील. If you have a legit reason to avoid contact of any kind then you should be very careful. या गोष्टी फार पटकन पसरतात!

जिद्दु यांनी जी माहिती दिलीय ती बरोबर आहे. मीसुद्धा सध्या याच प्रोसेसने जात आहे, माझे सगळे नातलग माझ्या विचारांशी सहमत आहेत ही जमेची बाब आहे.

आणि ह्यातले कुठलेही काम ऑनलाईन होत नाही. प्रत्यक्ष खेपा घालाव्या लागतात हे मी स्वानुभवावरून सांगते.