शेती करण्यात अर्थ नाही...
Submitted by मी_अनामिक on 25 July, 2019 - 09:57
पिढीजात आहे म्हणून धंदा करण्यात अर्थ नाही
शेतकरी बाप माझा, शेती करण्यात अर्थ नाही...
बाजारात भाव ठरवणाऱ्यांना एवढेच कळावे
अजून ह्यांना आता पिडण्यात अर्थ नाही...
ज्याच्या दावणीची जनावरं, बायकापोरं उपाशी
त्यास 'जगाचा पोशिंदा' म्हणण्यात अर्थ नाही...
चार-चौघात ज्याची माय निलाम होते
त्याला 'भुमीपुत्र' म्हणण्यात अर्थ नाही...
सदा परिस्थिती खेळे त्याच्या नशिबाशी
गुलामच तो,'बळीराजा' म्हणण्यात अर्थ नाही...
योजना सगळ्या फायलींत अन् कागदोपत्रीच
हत्याच ती, 'आत्महत्या' म्हणण्यात अर्थ नाही...
शब्दखुणा: