भटकंती

आईंचे तीर्थाटन - भाग ४: ग्रामीण जीवन

Submitted by वामन राव on 23 November, 2025 - 03:20

पूर्वीचा भाग: आईंचे तीर्थाटन - भाग ३: अंबाबाईचा उदो उदो

दीड वाजता पन्हाळ्यावरून निघालो. पुढे कणेरी मठाला जायचं होतं. सर्वांनाच भुका लागल्या होत्या. रस्त्यात एका ठिकाणी "हॉटेल सई शुद्ध शाकाहारी" असा बोर्ड वाचून थांबलो. एक कुटुंब नुकतंच बाहेर पडत होतं. त्यांना "जेवण कसं होतं?" असं विचारलं. "चांगलं होतं" असं उत्तर मिळाल्यावर आत शिरलो!

आईंचे तीर्थाटन - भाग ३: अंबाबाईचा उदो उदो

Submitted by वामन राव on 20 November, 2025 - 05:38
आईंचे तीर्थाटन - भाग ३: अंबाबाईचा उदो उदो

पूर्वीचा भाग: आईंचे तीर्थाटन - भाग २: जय भवानी

सकाळी सहाला उठलो. गाढ झोप झालेली होती. अगदी फ्रेश वाटत होतं. स्नान करून बाहेर पडायला सात वाजले. चहापाणी करून आठ वाजता श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात पोहोचलो. चौकशी केल्यावर दर्शनासाठी एक तास लागेल असे कळले. इथे ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी वेगळे व्यवस्था नाही असेही कळले.‌ मग संस्थानाच्या कार्यालयात जाऊन ₹७५१/- भरून अभिषेकाची पावती घेतली त्यावर दहा मिनिटात दर्शन झाले.‌

आईंचे तीर्थाटन - भाग २: जय भवानी

Submitted by वामन राव on 18 November, 2025 - 11:28
श्री तुळजाभवानी

पूर्वीचा भाग: आईंचे तीर्थाटन - भाग १: प्रास्ताविक

तीर्थाटनाचा आज प्रारंभ करायचा होता. सकाळी चारला उठलो. सहाला निघायचे होते पण निघेपर्यंत पावणेसात झाले. घरून निघाल्यावर दहा मिनिटात हैदराबादच्या आउटर रिंगरोडवर पोहोचलो. १२० च्या गतीने जाताना डिवायडरवरची हिरव्या झाडांची पिवळी फुले वाऱ्यावर डोलताना दिसत होती. "प्रवासाच्या शुभेच्छा, पुन्हा भेटू" असेच जणू म्हणत होती!

आईंचे तीर्थाटन - भाग १: प्रास्ताविक

Submitted by वामन राव on 16 November, 2025 - 12:00
आईंचे तीर्थाटन - भाग १: प्रास्ताविक

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ।
शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार ।।

माझा मामेभाऊ व बालपणापासून सख्खा मित्र श्रीधर पालमकर याचा दिवाळीच्या शुभेच्छांचा फोन आला. औपचारिक संवाद झाल्यावर, “वामन राव, बरेच दिवस झाले आई कुठे फिरायला गेलेली नाहीये. गोकर्ण, मुर्डेश्वर, उडपी वगैरे फिरू म्हणतीये; प्लानिंग करा की." असं बोलणं झालं.‌

माझी आई व माझ्या मामी दोघीही ७५ वर्षांच्या पुढच्या आहेत पण पर्यटनाचा उत्साह अगदी पौगंडावस्थेतील तरुणींचा आहे. सुदैवाने प्रकृती चांगली आहे. त्या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांची सोय लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन सुरू झाले.

महाराष्ट्र, कर्नाटक: तीर्थाटन, पर्यटन - मदत हवी आहे

Submitted by वामन राव on 22 October, 2025 - 11:28

नमस्कार मायबोलीकरांनो ,

पुढच्या आठवड्यात खालीलप्रमाणे तीर्थटन, पर्यटन, देशाटन वगैरे करण्याचा माझा विचार सुरु आहे. आमचा चार जणांचा गट आहे. सर्वांच्या तब्येती चांगल्या आहेत व सर्वांना प्रवासाचा पूर्वीचा अनुभव आहे. सर्वजण शाकाहारी आहेत. प्रवास कारने करायचा आहे व शक्यतो दिवसा करावा असे नियोजन आहे.

प्रारंभ: हैदराबाद, सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५

प्रवासी: १ - पुरुष - ४७ वर्षे, २ - पुरुष - ४७ वर्षे, ३ - स्त्री - ७५ - वर्षे, ४ - स्त्री - ७० वर्षे

शांतता- जनातली, मनातली, पर्यटनातली

Submitted by ललिता-प्रीति on 6 October, 2025 - 06:36

Villach. युरोपला जाणार्‍या पर्यटकांच्या यादीत ऑस्ट्रियातलं हे ठिकाण असण्याची शक्यता फारशी नसते. पर्यटक कंपन्यांनी सवय लावलेल्या ‘पॉप्युलर युरोप’मध्ये ऑस्ट्रियातली इन्सब्रुक, साल्झबर्ग ही शहरं असतात. कधीतरी चुकूनमाकून व्हिएन्ना असतं. पैकी पहिली दोन शहरं जर्मनीच्या सीमेलगत, त्यामुळे ‘पॉप्युलर युरोप’च्या वाटेवरच आहेत असं म्हणू शकतो. व्हिएन्ना पडली ऑस्ट्रियाची राजधानी. तुलनेने Villach खाली ऑस्ट्रियाच्या दक्षिण सीमेजवळ आहे. तिकडे वाट वाकडी करून कोण कशाला जातंय?
तरीही Villach ला (स्थानिक उच्चार - फिलाख) आमचे पाय लागले त्याला पर्यटनापलीकडचं एक वेगळंच कारण ठरलं.

नोव्हेंबरमध्ये बोस्टन गटग

Submitted by ललिता-प्रीति on 9 September, 2025 - 01:56

ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान बोस्टनवारीत तिथल्या माबोकरांना भेटण्याची इच्छा आहे.
(Marlborough मध्ये मैत्रिणीकडे माझा मुक्काम असणार आहे.)

१-२ नोव्हेंबरचा वीकांत मोकळा आहे.

कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा.
(गटगची चाचपणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा धागा काढायचा माहिती नाही. त्यामुळे 'लेखनाचा धागा'च सुरू केला आहे.)
फक्त बोस्टनमधलेच माबोकर असं काही नाही, आसपासचे कुणी येऊ शकणार असतील त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.
२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा - असं डोक्यात आहे.

तर, इथे कृपया सांगावे.

विषय: 

माझी संस्मरणीय भटकंती : ज्याची त्याची वारी.....

Submitted by अनया on 7 September, 2025 - 08:08

साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात पुण्याच्या वर्तमानपत्रात ‘पालखीच्या व्यवस्थेसंदर्भात कलेक्टर कार्यालयात उद्या बैठक’ अशा स्वरूपाची बातमी येते आणि मग पाठोपाठ ‘पालखी मार्गाची दुरावस्था’ वगैरे मथळ्यांखाली पालखी मार्गाच्या बाजूला पडलेला राडारोडा, रस्त्यावरील खड्डे वगैरे छायाचित्र येतात. स्थिर, संथ तळ्याच्या पाण्यात कोणीतरी गमतीने दगड टाकावा, आणि त्याचे तरंग तळ्याच्या काठापर्यंत हळूहळू पसरत जावे, तसा ‘पालखी’ हा विषय पुण्यात आणि परिसरात पसरत जातो. जसा जसा देहू किंवा आळंदीहून पालखीच्या प्रस्थानाचा दिवस जवळ येऊ लागतो, तसा त्या संदर्भातील बातम्यांना आणि चर्चेलाही रंग चढतो.

विषय: 

संस्मरणीय भटकंती - दक्षिण मुंबई (गेट वे - मरीन ड्राईव्ह) - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 6 September, 2025 - 01:00

गेल्यावर्षी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये, जवळजवळ दोन दशकांहून जास्त वर्षांनी, मी आणि माझ्या मैत्रिणींने दक्षिण मुंबईतील फोर्ट, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह भागाची मस्त सैर केली, आमच्या जुन्या आठवणी जागवण्याचा केलेला तो एक छोटा प्रयत्न होता.
भुरभुरत्या पावसातील दक्षिण मुंबईची ही काही क्षणचित्रे आणि आठवणी.

***

माझी संस्मरणीय भटकंती - सौलवँग! - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 2 September, 2025 - 16:08

सँटा बार्बरा होऊन सॅन फ्रान्सिस्कोला येताना मध्ये एक गाव लागतं सोलवान नावाचं. हे एक डॅनिश संकल्पनेवर आधारित अगदी छोटसं छान टुमदार गाव आहे. इथे आलेल्या डॅनिश लोकांनी 1911 मध्ये वसविलेलं. हे छोटं टुमदार गाव आजकाल मुख्यकरून घरांच्या वेगळ्या आर्किटेक्चरमुळे, डॅनिश बेकरी पदार्थांमुळे, तसेच घोडागाडी आणि रंगेबिरंगी सजविलेली छान दुकाने ह्यासाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

Pages

Subscribe to RSS - भटकंती