शांतता

शांतता

Submitted by Asu on 24 July, 2019 - 06:22

शांतता

शांतता...
मनाची एक अवस्था
अस्तित्व विसरण्याची व्यवस्था
सनईच्या सुरात
धडकत्या उरात
शांतता असते
पण...
सर्वांनाच ती कळत नसते
शांतता...
सगळ्यांनाच हवी असते
पण...
सर्वांनाच ती मिळत नसते
कारण...
अस्तित्व जिथे मिरवत नसते
तिथे शांतीची सुरुवात असते
ब्रम्हानंदी टाळी लागते
तिथे शांती नांदत असते
शांतीची ज्योत तेवत असते

शब्दखुणा: 

पनवेल मधील मुस्लीम बांधवांचे अभिनंदन

Submitted by स्पॉक on 7 September, 2015 - 23:22

शासनाने आणि माननीय कोर्टाने सर्व धर्मीयांना त्यांच्या सगळ्या प्रार्थना / उत्सवादरम्यान आवाज निंयत्रित करण्याची आणि इतरांना त्रास होणार नाही अशा शांततेत उत्सव साजरा करण्याची विनंती / आवाहन केले होते.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आमच्या गावातील सर्व मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पनेवलमधील सर्व मशिदींवरील बाहेरचे भोंगे (मराठीत स्पीकर्स) उतरवण्याचे मान्य केले आहे.

या अतिशय स्तुत्य निर्णयाबद्दल, पनवेलमधील सर्व मुस्लीम बांधवांचे मनापासुन अभिनंदन आणि धन्यवाद.

अस्वस्थ

Submitted by चाऊ on 18 June, 2014 - 07:39

भय वाटते शांततेचे करा गोंगाट करा
ढोल ताशे नगारे टिव्ही रेडीओ सुरु करा

बुडून जाऊ या कल्लोळात भोवतालच्या
बघू दडपतो का आवाज आतल्या कल्लोळाचा

बधीर सारी गात्रे नको ऎकू काही खरे
नुसताच आवाज, नको कुठल्या अर्थाचे किनारे

भणंग भटकणे दिशाहीन, आज भावते
न मिळाली मंझील तर? जीवा धाकावते

कमवू उधळू जाळू स्वता:ला आणी जगाला
कशास हवे काही कारण आज जगायला

चित्र नको नुसतेच रंगाचे फराटे
गुंगवून टाकणारे मायाजाल उफराटे

अशांत मन, तन, जग सारे तेवढेच उरते
विध्वंसाची पहाट फक्त उजाडताना दिसते

Subscribe to RSS - शांतता