आवाज बंद सोसायटी - भाग ५
Submitted by पाषाणभेद on 3 November, 2021 - 21:24
शब्दखुणा:
भय वाटते शांततेचे करा गोंगाट करा
ढोल ताशे नगारे टिव्ही रेडीओ सुरु करा
बुडून जाऊ या कल्लोळात भोवतालच्या
बघू दडपतो का आवाज आतल्या कल्लोळाचा
बधीर सारी गात्रे नको ऎकू काही खरे
नुसताच आवाज, नको कुठल्या अर्थाचे किनारे
भणंग भटकणे दिशाहीन, आज भावते
न मिळाली मंझील तर? जीवा धाकावते
कमवू उधळू जाळू स्वता:ला आणी जगाला
कशास हवे काही कारण आज जगायला
चित्र नको नुसतेच रंगाचे फराटे
गुंगवून टाकणारे मायाजाल उफराटे
अशांत मन, तन, जग सारे तेवढेच उरते
विध्वंसाची पहाट फक्त उजाडताना दिसते