३ डिसेंबरची सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़!
नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता.
- वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट
- "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही
- बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा
- कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी
- सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ!
- छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ
- ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा
- ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट
- "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!"
- सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम