ढासळला वाडा
Submitted by पाषाणभेद on 29 May, 2020 - 10:20
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी ) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन
चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥
का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे???
अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे