वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी ) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन
चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥
का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे???
अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे
कशी मेलि ती अवचित वेळी,येथे येउन उलथली...॥१॥
ठाऊक आहे तुझा हा तोरा,भारी शिस्तिची तू
तुझ्या कार्ट्याने टुथपेस्ट लाऊन,जिन्यात केली थू थू
तिथेच घसरून पडले मी ना,यात मी काय चूक केली? ॥२॥
दहा ला गं पाणी गेले,अता कोठूनी आणू???
एकच हंडा घरी राहिला,कुणाच्या डोक्यात हाणू
येकच बाद्ली र्हाय्ली होती,ती बचकन तू सांडली...! ॥३॥
असु दे आता घेऊन जा ग, माझ्या घरनं पाणी
डोके दुखले ऐकून तुझी ही ,सक्काळी सक्काळी पिपाणी
एका बादलिनी माझी इश्टेट,कुठे गं खाक्कन जळ्ली?...॥४॥
ठेव तुझी ती बाद्ली तुलाच,घे डोसक्यावर ओतून
मि ही पाणी ड्र्मातले काढीन,भरलाय तो काल पासून
जा जा तुझे उपकार नको,इश्टेट तुझिही कळ्ली..! ॥५॥
==========================================================
या नंतर सदरहू दोन्ही महिला...एकमेकिस... ''ह्हूं...!!!'' असा केवळ स्त्रीजन्य आवाज काढून हुसकाऊन लावल्याच्या आनंदात घरी गेल्या...पुढे संध्याकाळी काय जाहले... ते पुढिल भागात पाहू
(No subject)
=))
=))
(No subject)
वरच्या मजल्या वरची शिंदिण
वरच्या मजल्या वरची शिंदिण

आमच्या वाडीत आहे ही... वरच्या मजल्यावरच...

(No subject)
हे हे
हे हे
@आमच्या वाडीत आहे ही...
@आमच्या वाडीत आहे ही... वरच्या मजल्यावरच... >>>
त्यां'चिच वाट बघतोय मी पण...
बोंबला तिच्यायला, इथल्या शिंदिणी उचकायच्या.. अता पळा...

(No subject)
(No subject)
बुवा काय धिंगाणा
बुवा काय धिंगाणा लावलाय…कवितेतून बटाट्याची चाळ डोकावल्याचा भास झाला !
(No subject)
@कवितेतून बटाट्याची चाळ
@कवितेतून बटाट्याची चाळ डोकावल्याचा भास झाला ! >>> होणारच
तुंम्हा ऐति-हासिक व्यक्तिंना एका बखरीवरून दुसर्या(बखरिचा) अंदाज यायचाच . 
एकदम भारी हो या नंतर सदरहू
एकदम भारी हो

या नंतर सदरहू दोन्ही महिला...एकमेकिस... ''ह्हूं...!!!'' असा केवळ स्त्रीजन्य आवाज काढून हुसकाऊन लावल्याच्या आनंदात घरी गेल्या............ हे तर अल्टिमेट
फार छान..आवडली.
फार छान..आवडली.
भांडणास आलेल्या सर्व महिलांचे
भांडणास आलेल्या सर्व महिलांचे आभार...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणी पुरुष मंडळीस धन्यवाद.
बापरे --//\\--
बापरे --//\\-- तुम्हाला.
अप्रतिम......
अफाट कविता आहे. बारीक
अफाट कविता आहे. बारीक निरीक्षणशक्तीला दाद
पुढचा भाग लवकर येऊ द्या हो बुवा
भांडान रायलं का नाय ? बाड्यात
भांडान रायलं का नाय ? बाड्यात बायांना धुमसत ठिवु नगासा.
सोत्ताला जपा.
(No subject)
बाबूराव @सोत्ताला जपा. >>>
बाबूराव
@सोत्ताला जपा. >>> जी द्येवा...
(No subject)