मी प्रथम कोकणात , गुहागरला गेलो मित्रांसमवेत , मित्राच्याच घरी... १९८५ मधे.
अगदी आपण कोकणतलं घर म्हणून जे सर्व ऐकलेलं असतं , ते सारं आहे त्या घरात. खालच्या पाटातलं हे १०० वर्षे वयाचं कौलरू घर . पडवी , सोपा , झोपाळा , माजघर , देवघर इतर खोल्या...मागे परसात विहीर , नारळ , सुपारी ची शेकडो झाडं... आणि त्या मागे थेट पुळण आणि अथांग पसरलेला , डोळ्याला फक्त आणि फक्त निववणारा सागर... सतत गाज देऊन आधाराची भक्कम जाणीव करून देणारं त्याचं अस्तित्व !
आमचं कोकणातलं घर परसभागाशिवाय अपूर्ण आहे. म्हणून चला ... आज मी तुम्हाला आमचं परसदार फिरवून आणते. परसदार म्हणजे नावातच अर्थ दडलेला आहे... घराचा मागचा भाग.
आपली खाद्य संकृती पंचक्रोशीच्या सीमा ओलांडून कधी पलीकडे गेली ते समजलं ही नाही. जिल्हा, प्रांत ह्यांच्या पलीकडे जाऊन आता आपण दुसऱ्या देशातले ही पदार्थ आपलेसे केले आहेत. घावन , आंबोळ्या ह्यांच्या बरोबर डोसे, अप्पम ह्यांनी ही न्ह्याहरी च्या ताटलीत मानाचे स्थान पटकावले आहे. आणि थलिपीठं, आणि कुरडया शेवया इतकाच नव्हे तर काकणभर अधिकच पिझ्झा आणि पास्ता आपल्याला आवडू लागला आहे. अर्थात त्यात काही गैर आहे असं ही नाही. सतत नावीन्याचा ध्यास, ओढ हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. ह्या मुळेच तर मानवाने इतकी प्रगती करून दाखवली आहे . असो.
कोकण म्हटलं की त्याला एकच विशेषण सार्थ आहे आणि ते म्हणजे “ सुंदर “ ! तिथली वृक्षराजी, त्यात लपलेली छोटी छोटी घरं, निळेशार शांत समुद्र किनारे, त्यातुन आत आलेल्या छोट्या छोट्या खाड्या, लहान लहान व्हाळ , नागमोडी रस्ते , हे सगळं तर सुंदर आहेच पण कळस म्हणजे तिथले खडक ही वैशिष्ट्य पूर्ण आणि सुंदर आहेत. तुम्ही म्हणाल खडकात कसलं सौंदर्य ? चला तर मग, सांगतेच आता ह्या खडकांच्या सौंदर्याबद्दल.
मे महिन्यात कोकणात आंबे फणस तर असतातच पण तोरणं, चारणं, शिवणीची फळं, जांभळं, करवंद असा रानमेवा ही खूप मिळतो. . विषय निघालाच आहे तर चारणं म्हणजे काय ते सांगते. आपण सुक्या मेव्यातली चारोळी आणतो त्याचं फळ म्हणजे चारणं. हे तसं आकाराने गोल आणि लहानच असतं. गर ही अगदीच थोडा असतो बी भोवती. पण ती बी फोडली की आत चारोळी मिळते. ह्या बिया फोडणे हे खूपच वेळमोडं आणि कटकटीचे काम आहे. ती एवढीशी बी हातात धरून स्वतःच्या हातावर मारून न घेता छोट्याशा हतोडीने बी वर हलकेच घाव मारायचा कारण जोरात घाव बसला तर आतल्या चारोळीचा चेंदामेंदा नक्की.
निसर्गाचा कोकणावर वरदहस्त आहे आणि कोकणच्या पदरात निसर्गाने अनेक रत्न टाकली आहेत. परंतु त्यातील पुष्कळशी उन्हाळ्यातच येत असल्याने आंब्या फणसाच्या प्रभावळी पुढे त्यांची चमक फिकी पडते आणि सामान्य लोकांच्या नजरेला ती पडत नाहीत. ह्या रत्नातल माणिक आहे .... ओळखलंत का ?... नसेल तर सांगते ... हे माणिक म्हणजे कोकम. ह्याचा रंग अगदी माणका सारखा चमकदार लाल असतो म्हणून मी ह्याला कोकणातलं माणिक म्हणते. शहरात हे आमसुलं म्हणून ओळखलं जातं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधी ही आमसुलं म्हणणार नाही.
श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या रक्षबंधन, गौरी गणपती नवरात्र, दसरा अशा सणांची, उत्सवांची सांगता होते दिवाळीने . पण गावाकडे जिथे स्वतःची घरं असतात, घरांपुढे अंगण असत आणि अंगणात तुळशी वृंदावन असतंच असत तिथे दिवाळी झाली तरी सणाचा माहौल टिकून असतो कारण दिवाळी नंतर वेध लागतात तुळशीच्या लग्नाचे . कोकणात आमच्याकडे ही तुळशीचं लग्न फार थाटामाटात साजरं होत दरवर्षी.
जगात सर्वानाच झोपाळ्याचं आकर्षण असतं. झोपाळ्याचे उल्लेख अगदी रामायण महाभारतात ही आहेत. राधा कृष्णा च्या रास क्रीडेत झोपाळा असतोच. मराठीत ही झुला / झोपाळा ह्या विषयावर झुलवू नको हिंदोळा, झुलतो झुला, उंच उंच माझा झोका या सारखी अनेक प्रेमगीत, बालगीत, कविता लिहिल्या गेल्या आहेत. कोकणातल्या माणसांना हे झोपळ्याचं वेड जरा जास्तच असत. पिढ्यान पिढ्याच्या दारिद्र्यामुळे, कोकणात असलेल्या द्ळण वळणाच्या कमतरतेमुळे कोकणी माणसाचं आयुष्य तसं खडतरच असत. झोपळ्याच्या हिंदोळ्यावर त्याच मन स्वप्न रंजनात रमत असेल म्हणून कदाचित कोकणी माणसाला झोपाळा जास्त आवडत असावा.
आमच्या कोकणातल्या घरा वरचा आणखी एक लेख
पुष्पा, गो, ती मोठी कढई दे जरा पटकन घासून.
पुष्पा, तेवढं अळू दे चिरून आणि आठळ्या ही दे सोलून आळवात घालायला
पुष्पा, ह्या ओढणीचा रंग जातोय तेव्हा वेगळी धु.
पुष्पा , निखिलला घे जरा आणि आगरात फिरवून आण.... किती किरकिरतोय बघ.
तुम्ही ओळखलचं असेल ही पुष्पा कोण ते. हो बरोबर आहे … ही आमची कोकणातल्या घरची कामवाली . पु. लं च्या नारायणा सारखी हसतमुखाने सर्व आघाड्यांवर लढत असते दिवसभर.
कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.