एका रम्य, नितांतसुंदर संध्याकाळी
प्राजक्ताचं एक फूल अगदी अलगद
माझ्या हाती येऊन विसावले
मी हसलो त्याच्याकडे बघत,
त्याच्या परिमळ अंगांगात भिनला जणू
तेही टपोरे हसत होते हे पाहून
पण, त्या फूलावरचे अवेळचे दव
अस्वस्थ करीत होते मला सतत
आपले जन्मदाते झाड सुटल्याचे दुःख
सलत होते बहुदा त्याला कुठेतरी
त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात
मग मी ही त्याला ठेवले झाडाच्या पानावर
त्याचे टपोरेपण खुलूनच दिसले
त्या हिरव्याकंच पानांवरती
खुशीत होते ते, झुललेही झुला
वाऱ्यावर स्वार, अपेक्षांच्या ओझ्याशिवाय
जगात सर्वानाच झोपाळ्याचं आकर्षण असतं. झोपाळ्याचे उल्लेख अगदी रामायण महाभारतात ही आहेत. राधा कृष्णा च्या रास क्रीडेत झोपाळा असतोच. मराठीत ही झुला / झोपाळा ह्या विषयावर झुलवू नको हिंदोळा, झुलतो झुला, उंच उंच माझा झोका या सारखी अनेक प्रेमगीत, बालगीत, कविता लिहिल्या गेल्या आहेत. कोकणातल्या माणसांना हे झोपळ्याचं वेड जरा जास्तच असत. पिढ्यान पिढ्याच्या दारिद्र्यामुळे, कोकणात असलेल्या द्ळण वळणाच्या कमतरतेमुळे कोकणी माणसाचं आयुष्य तसं खडतरच असत. झोपळ्याच्या हिंदोळ्यावर त्याच मन स्वप्न रंजनात रमत असेल म्हणून कदाचित कोकणी माणसाला झोपाळा जास्त आवडत असावा.
थेट हृदयाचा ठोका होत मन तृप्त करणारा तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस... तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या रसिकजनांच्या मनांवर ठसलेल्या प्रतिमा...