ललित
मोप्रकॉतको पंतप्रधान झाल्यास …
(लमाल १६ जून २०१२ ओळख)
आशिष महाबळ
निर्विचारी: मोदी पंतप्रधान झाल्यास ..
अविचारी: मोदीच का?
निर्विचारी: वाक्य तर पूर्ण करु देशील?
अविचारी: बरं, बोल.
निर्विचारी: मोदी पंतप्रधान झाल्यास देशात बरेच बदल होतील.
अविचारी: गुजरातची झाली तशी देशाचीही भरभराट होईल.
निर्विचारी: मी तसं म्हणणार नाही. माझा रोख मोदीच्या हिंदुत्ववादी अजेंड्याकडे आहे.
अविचारी: मोदी केवळ कॅपिटलीस्ट आहे. म्हणूनच हिंदुत्ववादी मोदीच्या विरोधात आहेत. कॅपिटलीझमच भारताला तारु शकेल.
निर्विचारी: अचानक कॅपिटलीझमचे गुणगान? ठिकाय, हिंदुत्ववादी नाही तर मुस्लीमविरोधी मताबद्दल मला बोलायचं आहे.
इशारों इशारों में दिल लेनेवाले...
लताच्या गाण्यांवर लागोपाठ दोन लेख लिहिलेले पाहून बहिणीने मुद्दाम फोन करुन निषेध व्यक्त केला - म्हणाली, 'तुला माहितिये मला आशा जास्त आवडते म्हणून मुद्दाम मला चिडवायला लतावर लेख लिहिलेस ना?' तिची समजूत घालताना माझी पुरेवाट झाली! तरी तिला सांगून पाहिलं की बये, दुसरा लेख दोघींनी म्हटलेल्या गाण्यांवर लिहिलाय ना... पण बाईसाहेब अश्या काही फुरगंटून बसल्या, काही केल्या पटेचना. शेवटी म्हटलं, बरं, मग आता काय लिहू तूच सांग. म्हणाली की आशा-रफी अशा द्वंद्वगीतांवर लिही काहीतरी आणि मग फोन कर. तोवर केलास तर तुझ्या मेहुण्यांशी, भाचरांशी बोल...
अो चाँद जहाँ वो जाये...
दोन बहिणी... खरं तर चार; पण याच दोघींवर सगळ्यांच प्रेम आणि लक्ष केंद्रित होतं. अर्थात त्याला कारणंही अनेक आहेत, पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासारखं या जगात कोणी नाही... याआधी झालं नाही आणि पुढचं कोणी पाहिलंय? मजा म्हणजे त्या दोघींमध्येही फारसं साम्य नाही. दोघींची गाण्याची जात निराळी, अदा निराळी, पेशकारी निराळी; इतकंच काय, पण दोघींच्या आवाजातला दर्दही निराळा...
तीनी सांजा सखे मिळाल्या...
संध्याकाळची वेळ फार विचित्र असते नाही? त्यातून कालच्यासारखी आज नसते आणि आजच्यासारखी उद्या... खरं तर सूर्य नुकताच क्षितिजाखाली गेलाय आणि आकाशात एखादी चांदणी नुकतीच डोकावतेय, चंद्राच्या आगमनाची चाहूल देतेय यापेक्षा फार काही वेगळं बाहेर घडत नसतं. जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं.
तुला पाहिले मी...
ग्रेसच्या ओळींवर लिहीले गेलेले अजून काही, त्यालाच अर्पण ...
........................
बाबांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन पार पडलं होतं. हॉस्पिटलमध्ये एक दिवस रहावं लागलं होतं. मी आणि बहीण दोघेही परदेशात होतो. त्यामुळे आईबाबांना ते दोन्ही बघावं लागलं होतं, याचा सल मनात होताच. अंतरांचे अवगुण अगदी प्रकर्षाने अंगावर आले. त्यातच बाबांनी हॉस्पिटलमधून घरी येताना चालत यायचा पराक्रम केला. कुठलाही रिक्षेवाला सोडायला तयार नव्हता म्हणून. मग तर तो सल अगदी चक्रवाढ पद्धतीने द.ता.द.से. वाढत होता.
गणगोत ..
अन्नं वै प्राणा: (८) - (२)
देशोदेशीची किती नगरे - किती राजधान्या...
माणसाची किती कर्तृत्वे - किती नद्या, किती सागर, किती वाळवंटे,
किती अज्ञात जीव, किती अनोळखी वृक्ष...
कितीतरी राहून गेले आहे पाहायचे
विशाल विश्वाचे हे आयोजन.
एका क्षुद्र कोपर्यात गुंतून राहिलेय माझे मन.
त्या क्षोभामुळेच वाचत असतो प्रवासवर्णने
अक्षय उत्साहाने
जिथे घडते एखादे चित्रमय दर्शन -
लगेच घेतो टिपून.
माझ्या ज्ञानातल्या उणिवा काढतो भरून
अशा त्या भीक मागून मिळवलेल्या धनातून.
कंबोडिया आणि ईंडोनेशिया भेट
मला वाचायला जितक आवडत त्याहून कैक पटीने मनातले भाव लिहून काढायला फार फार आवडतात. मी साहित्य पाडणार्यातला नाही हे मला खूप चांगले माहिती आहे. त्यामुळे जग काय म्हणेल अशी तमा मला लिहिताना मुळीच नसते. आपण जे जग बघतो तेच जग अनेक जण बघत असतात पण इथे प्रत्येकाची सवेंदना वेगळी आहे. हे स्वान्तसुखाय म्हणून लिहिताना जितके मला दरवेळी जाणवते तेवढे इतर वेळी जाणवत नाही. खूप दिवसांपासून कंबोडियाबद्दल मला लिहायचे होते. काल परवाच मी ईंडोनेशिया वरुन परत आलो. मग तिथे जे काही पाहिले त्याबद्दल प्रवास वर्णन वगैरे नाही पण जे अनुभवल त्याबद्दल लिहू असे वाटायला लागले.
अशांत शांत
रोजच्या जगण्याचं हे दैनंदिन धबडगं इतकं आवश्यक का होऊन बसतं, काही कळत नाही. हंड्याहंड्याने पाणी भरताना माठालाच भोक असल्याने शेकडो हजारो हंडे टाकूनही तो भरू नये, पण तो भरत राहणं मात्र श्वास घेण्याइतकंच आवश्यक होऊन बसावं, असं काहीतरी. श्वास घेण्याला निदान काही निश्चित अर्थ आहे, प्रयोजन आहे. इथं मात्र ते हंडे, माठ, पाणी आणि ते भरणं- सारंच निरर्थक.
Pages
