सचिनीझम
सचिनने नुकतीच एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती जाहिर केली. क्रिकेटचा एक अनभिषिक्त सम्राट आता आपल्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये परत दिसणार नाही. त्याच्या खेळाने, वागण्याने जो आनंद त्याने वाटला आहे तो फार फार अमूल्य ठेवा आहे. एक दिवसीय सामन्यांमधल्या माझ्या आठवणीत राहिलेल्या या काही खेळ्या.
१. शारजा स्टॉर्म : भारताला अंतिम फेरीत पोचवायला आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले शतक.