सचिनीझम
सचिनने नुकतीच एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती जाहिर केली. क्रिकेटचा एक अनभिषिक्त सम्राट आता आपल्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये परत दिसणार नाही. त्याच्या खेळाने, वागण्याने जो आनंद त्याने वाटला आहे तो फार फार अमूल्य ठेवा आहे. एक दिवसीय सामन्यांमधल्या माझ्या आठवणीत राहिलेल्या या काही खेळ्या.
१. शारजा स्टॉर्म : भारताला अंतिम फेरीत पोचवायला आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले शतक.
२. केनया विरूद्धची ९९ च्या विश्वचषकातली सेंच्यूरी . त्याचे वडील वारल्याला केवळ काही दिवस झाले होते.
३. हिरो कपमधली द. अफ्रिकेविरुद्धची शेवटची ओव्हर
४. २००३ वर्ल्डकपमधली सचिनची इनिंग. शोएब अख्तरला लगावलेले दोन जब्बरदस्त टोले.
sach is life.
भाग २.
1994 Sachin Tendulkar 82 off 49 balls vs New Zealand 2nd ODI - YouTube : एकदिवसीय सामन्यातला ओपनर हा प्रकार इथून सुरू झाला [बहुतेक]
वैद्यनाथन http://www.espncricinfo.com/magazine/content/current/story/598402.html
नंद्या... का माहित नाहे पण
नंद्या...
का माहित नाहे पण तुझ्याकडून एक धागा येईल असे वाटतच होते...
पुन्हा येउन इथे लिहेनच..
ह्या वरच्या सगळ्या यु-ट्युब लिंक्स आहेत का?
यात ऑस्ट्रेलिया विरुध्द १७५
यात ऑस्ट्रेलिया विरुध्द १७५ रन्स ची खेळीचा सुध्दा समावेश झाला पाहिजे
sach is life. > सचिनची
sach is life. >
सचिनची पुर्ण कारकीर्द पहाणारे आपण सगळेच नशिबवान आहोत.
मला तर बरंच काही आठवतंय....
मला तर बरंच काही आठवतंय....
खेळामधे ३ नशिबवान लोक १
खेळामधे ३ नशिबवान लोक
१ ज्यांनी ब्रॅडमन ची कारकिर्द पाहिली
२ ज्यांनी पेलेची कारकिर्द पाहिली
३ ज्यांनी सचीन ची कारकिर्द पाहीली
.
बाकीचे ...
द्रविड, सचिन, दादा, लक्ष्मण,
द्रविड, सचिन, दादा, लक्ष्मण, कुंबळे हे अतिरथी म्हणजे माझ्या जनरेशनचे. जन्माने एक दोन वर्षे इकडे तिकडे. आता हे लोकं निवृत्त होत आहेत त्यामुळे बहुदा माझ्या जनरेशनला (जे क्रिकेट वेडे आहेत मिड लाईफ क्रायसेस येणार.
गोल्डन ईरा इज डेफिनेटली ओव्हर फॉर इंडियन क्रिकेट. तसा तो २०१० मध्येच संपला, पण २०११ मध्ये धुगधुगी होती, २०१२ मध्ये तर घरीच लोकं आपल्याला हाणत आहेत.
१९९३ साली मी ठाण्याच्या
१९९३ साली मी ठाण्याच्या दादोजी स्टेडियमला एक सामना बघायला गेलेलो तेंव्हा, सचिनला प्रथम जवळून पाहिले होते. अगदी जवळून. प्रवीण आमरे, मांजरेकर आणि कांबळीला देखील.
त्या सामन्यात सचिनने प्रतिस्पर्धी संघाला धुवत १५० नाबाद ठोकले होते. धमाल मज्जा....
वर नंद्याने शारजा स्टॉर्म
वर नंद्याने शारजा स्टॉर्म सिरिजचा उल्लेख केला आहे त्यात जेवढी सचिनची बॅटिंग लख्ख लक्ष्यात आहे इतकेचीच लक्ष्यात आहे ती टोनी ग्रेगची कॉमेंट्री...
सच इज लाईफ, खरंच. लोक्स, ह्या
सच इज लाईफ, खरंच.
लोक्स, ह्या धाग्यावर त्याच्या मुलाखती, खेळांचे व्हिडिओ वगैरे सर्व काही संकलित करता येईल.
सचिनच्या एकदिवशीय सामन्यातील
सचिनच्या एकदिवशीय सामन्यातील शतकं....
१ - ११० - ऑस्ट्रेलिया - १९९४, भारत विजयी
२ - ११५ - न्यूझीलंड - १९९४, भारत विजयी
३ - १०५ - वेस्ट इंडिज - १९९४, भारत विजयी
४ - ११२* - श्रीलंका - १९९५, भारत विजयी
५ - १२७* - केनिया - १९९६, भारत विजयी
६ - १३७ - श्रीलंका - १९९६, भारत पराजीत
७ - १०० - पाकिस्तान - १९९६, भारत पराजीत
८ - ११८ - पाकिस्तान - १९९६, भारत विजयी
९ - ११० - श्रीलंका - १९९६, भारत पराजीत
१० - ११४ - द. आफ्रिका - १९९६, भारत विजयी
११ - १०४ - झिम्बाब्वे - १९९७, भारत विजयी
१२ - ११७ - न्यूझीलंड - १९९७, भारत विजयी
१३ - १०० - ऑस्ट्रेलिया - १९९८, भारत विजयी
१४ - १४३ - ऑस्ट्रेलिया - १९९८, भारत पराजीत. भारताला अंतिम फेरीत पोचवायला आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले शतक.
१५ - १३४ - ऑस्ट्रेलिया - १९९८, भारत विजयी
१६ - १००* - केनिया - १९९८, भारत विजयी
१७ - १२८ - श्रीलंका - १९९८, भारत विजयी
१८ - १२७* - झिम्बाब्वे - १९९८, भारत विजयी
१९ - १४१ - ऑस्ट्रेलिया - १९९८, भारत विजयी
२० - ११८* - झिम्बाब्वे - १९९८, भारत विजयी
२१ - १२४* - झिम्बाब्वे - १९९८, भारत विजयी
२२ - १४०* - केनिया - १९९९, भारत विजयी
२३ - १२० - श्रीलंका - १९९९, भारत विजयी
२४ - १८६* - न्यूझीलंड - १९९९, भारत विजयी
२५ - १२२ - द. आफ्रिका - २०००, भारत विजयी
२६ - १०१ - श्रीलंका - २०००, भारत पराजीत
२७ - १४६ - झिम्बाब्वे - २०००, भारत पराजीत
२८ - १३९ - ऑस्ट्रेलिया - २००१, भारत विजयी
२९ - १२२* - वेस्ट इंडिज - २००१, भारत विजयी
३० - १०१ - द. आफ्रिका - २००१--------------
३१ - १४६ - केनिया - २००१, भारत विजयी
३२ - १०५* - इंग्लंड - २००२, No result
३३ - ११३ - श्रीलंका - २००२, भारत विजयी
३४ - १५२ - नाम्बिया - २००३, भारत विजयी
३५ - १०० - ऑस्ट्रेलिया - २००३, भारत विजयी
३६ - १०२ - न्यूझीलंड - २००३, भारत विजयी
३७ - १४१ - पाकिस्तान - २००४, भारत पराजीत
३८ - १२३ - पाकिस्तान - २००५, भारत पराजीत
३९ - १०० - पाकिस्तान - २००६, भारत पराजीत
४० - १४१* - वेस्ट इंडिज - २००६-----------------------
४१ - १००* - वेस्ट इंडिज - २००७, भारत विजयी
४२ - ११७* - ऑस्ट्रेलिया - २००८, भारत विजयी
४३ - १६३* - न्यूझीलंड - २००९, भारत विजयी
४४ - १३८ - श्रीलंका - २००९----------
४५ - १७५ - ऑस्ट्रेलिया - २००९---------
४६ - २००* - द. आफ्रिका - २०१०, भारत विजयी
४७ - १२० - इंग्लंड - २०१०----------
४८ - १११ - द. आफ्रिका - २०११--------------
४९ - ११४ - बांगलादेश - १६ मार्च २०१२, भारत विजयी
---
वरिल आकडेवारी पहाता, कोण म्हणतो सचिनने शतक केल्यावर भारत मॅच हरतो.
१३ - १०० - ऑस्ट्रेलिया -
१३ - १०० - ऑस्ट्रेलिया - १९९८, भारत विजयी
१४ - १४३ - ऑस्ट्रेलिया - १९९८, भारत पराजीत. भारताला अंतिम फेरीत पोचवायला आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले शतक.
१५ - १३४ - ऑस्ट्रेलिया - १९९८, भारत विजयी
१६ - १००* - केनिया - १९९८, भारत विजयी
१७ - १२८ - श्रीलंका - १९९८, भारत विजयी
१८ - १२७* - झिम्बाब्वे - १९९८, भारत विजयी
१९ - १४१ - ऑस्ट्रेलिया - १९९८, भारत विजयी
२० - ११८* - झिम्बाब्वे - १९९८, भारत विजयी
२१ - १२४* - झिम्बाब्वे - १९९८, भारत विजयी
एकाच वर्षात ९ शतक......हाही एक रेकॉर्ड असेल
*पदार्पण -१८-१२-८९
*पदार्पण -१८-१२-८९ (पाकिस्तानविरुद्ध)
*पहिले शतक - ९-०९-१९९४ (विरुद्ध ऑस्ट्रेलिया ११० धावा)
* वर्षभरातील सर्वाधिक धावा - १९९८ (९ शतकांसह १८९४ धावा)
* सर्वाधिक भागीदारी - १९९९ (द्रविडसह दुसऱ्या विकेटसाठी ३३१ धावा)
* १०००० धावा - ३१-०३-२००१ २६६ वा सामना
* १५००० धावा - २९-०६-२००७ - ३८७ वा सामना
*शतकांचा विश्वविक्रम -१७ शतकांचा डेसमंड हेन्सचा विक्रम मोडला
*पहिले द्विशतक - २४-०२-२०१०
* ४४२ वा सामना -ग्वालियर
* विश्वविजेतेपद - २-४-२०११
* कारकीर्दीतले १०० वे शतक - १६-०३-२०१२ - मीरपूर
२६ वेळा सर्वाधिक शतकी सलामी (सौरव गांगुलीसोबत)
* ९० मैदानांवर खेळलेला जगातील एकमेव खेळाडू
* एका प्रतिस्पध्र्याविरुद्ध सर्वाधिक ९ शतके (ऑस्ट्रेलिया)
जे हवे ते इथे मिळेल....
जे हवे ते इथे मिळेल....
http://www.sachinstats.com/
<< खेळामधे ३ नशिबवान लोक >>
<< खेळामधे ३ नशिबवान लोक >> मला वाटतं सत्तरी गांठलेल्या आमच्या पिढीतील लोक खरे नशीबवान. वाडेकरने सुरूं केलेलं सुनील-विश्वनाथ- कपिल युग व मग सचिन- द्रविड- लक्ष्मण -सौरव- अनिल युग या दोन्हीचे साक्षीदार असलेले आम्ही खरंच हेव्याला पात्र आहोत ! कारकिर्दीच्या शेवटच्या पर्वात असलेले कां असेनात पण सी.के नायुडू, फ्रँक वॉरेल, , वेस्ली हॉल, नील हार्वे, लींडवॉल [ what a majestic, rhythmic style of fast bowling !], रिची बिनॉ इ.इ. रथी महारथींच्या खेळाची झलक अगदीं लहानपणीं ब्रेबॉर्नवर पहायला मिळणं हें आमचं पूर्वजन्मीचं संचितच !!
अर्थात, या सर्वावर ' सचिन झालासे कळस ', हें आलंच !!!
अगदी खरं भाउ...
अगदी खरं भाउ...
माझ्या ghost id ने लिहिलेले
माझ्या ghost id ने लिहिलेले वाटतेय हे article http://www.espncricinfo.com/magazine/content/current/story/598402.html
नंद्या हे चिकटव वर.
अवांतरः >> खेळामधे ३ नशिबवान
अवांतरः
>>
खेळामधे ३ नशिबवान लोक
१ ज्यांनी ब्रॅडमन ची कारकिर्द पाहिली
२ ज्यांनी पेलेची कारकिर्द पाहिली
३ ज्यांनी सचीन ची कारकिर्द पाहीली
<<
बोर्ग अन नवरातिलोव्हा अॅड करावे का?
असाम्या, सही आर्टिकल! स्सेम
असाम्या, सही आर्टिकल! स्सेम टु स्सेम फीलिन्ग्ज !!
रोहन >> ती टोनी ग्रेगची
रोहन
>> ती टोनी ग्रेगची कॉमेंट्री...
अगदी अगदी ... 'व्हॉड्डाप्लेया !'
मंजूडी : तुला आठवणार्या खेळ्यांबद्दल अजून लिही ना.
मी लिहीलेल्या खेळ्या , या माझ्या काही ना काही आठवणींशी जोडलेल्या आहेत [जशी राजेश चौहानची पाकिस्तानात सकलेनला मारलेली सिक्स आणि त्यानंतरची स्टेडियममधली शांतता] . जमेल तेव्हा त्यावर मी लिहीनच. ८७ पासून हा मनुष्य खेळतो आहे. पत्त्याच्या डावातले हुकूम बदलले तरी हुकमी पत्ता मात्र तोच. इतकी वर्षे, खेळातले सातत्य, फिटनेस राखणे, खेळातला रस टिकवून ठेवणे, नव्हे दरवेळेस स्वतःमध्ये थोडे थोडे बदल करून आणणे. प्रॅक्टीस हे सगळे थक्क करून सोडणारे आहे. २०११ वर्ल्डकपच्या वेळेस कोहली जे बोलला ते अगदी माझ्या मनातले त्यावेळेसचे भाव होते.
असाम्या - सही लेख आहे. खूप ठिकाणी 'अगदी अगदी' झाले वाचताना.
मला सर्वात प्रिय म्हणाजे
मला सर्वात प्रिय म्हणाजे पहिल्याच पाकिस्तान दौर्यात अब्दुल कादिर च्या बोलिंग वर नाकाला झालेली जखम , त्यावर मलमपट्टी करून नाक पुसत लगेच पुढे येऊन सणकन कानाखाली लावल्यासारखा हाणलेला तो फटका ! तसंच रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून चढवून ठेवलेल्या शोएब अख्तर ची २००३ वर्ल्ड कप मधे केलेली धू धू धुलाई .. पार डीरेल केले त्याला! तश्शाच थाटात नंतर केव्हातरी शेन वार्न ची पार लक्तरे केली तेव्हाचा तो अॅटिट्युड! परत परत पाहत असते मी या क्लिप्स. सचिन - अन अॅन्ड ओन्ली आहे अन राहील.
ती साउथ अफ्रिकेविरुद्ध ची लास्ट ओव्हर विसरलेच होते. थॅन्क्स नंद्या.
मस्त अर्टिकल , असामी .
मस्त अर्टिकल , असामी :).
[जशी राजेश चौहानची
[जशी राजेश चौहानची पाकिस्तानात सकलेनला मारलेली सिक् > ती विल्स सिरीज सचिन as a captain म्हणून brilliant होती, त्याने ज्या तर्हेने राजेश चौहानला वापरलेले कि यंव रे बच्चू. यादे ...
My favorite moment of Sachin is "he crying on shoulders of Sanjay Manjrekar after loss in Eden Gardens in 96 semi final against lanka." It showed what his character is. Next closest is Sharajah dessert storm against Aussies followed by 2003 Pakistan match. केवळ ह्या तीन प्रसंगांसाठीसुद्धा मी सचिनचा सदैव र्हुणी राहीन. बाकीचे सगळे तर अगणित अमर्याद आहे. कशा कशा साठी त्याचे आभार मानायचे ?
सही आर्टिकल.. असाम्या, सही
सही आर्टिकल..
असाम्या, सही आर्टिकल! स्सेम टु स्सेम फीलिन्ग्ज !!
>>> यस.... फॉर ऑल ऑफ अस..
सचिनने सकलेनला देखील एका
सचिनने सकलेनला देखील एका सामन्यात त्याच्या पहिल्याच चेंडुवर छक्का टोलावला होता. ते षटक संपल्यावर मुश्ताक अहमद सचिन जवळ येउन त्याला म्हणाला की, त्याला पुढे येउन मारलेस तसा मला पुढे येउन मारून दाखव...
यावर सचिन उत्तरला की, तुला सिक्स मारायला मला पुढे देखील यायची गरज नाहिये.

पुढच्या ओव्हरला मुश्ताकला टोलावला क्रिझ मध्येच उभा राहून...
‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या नावाचे
‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या नावाचे एक छोटेसे संग्रहालय पुण्याच्या ऱोहन पाटे नावाच्या मुलाने उभे केले आहे.
Sachin Tendulkar alone scored
Sachin Tendulkar alone scored 11.27% of all the runs and 24.50% of all the hundreds scored by all Indian batsmen in ODIs!!!
In ODI history, Sachin Tendulkar has scored most runs in wins (11157 runs) and also hit most 100s in wins (33 hundreds). #legend
Sachin Tendulkar retires one 100 short of 50 ODI hundreds & four 50s short of 100 50s.Where are those people who said he played for records?
Out of 452 innings in which Tendulkar batted in ODIs, he top-scored for India in 129- that is,one in every four innings! - www.sachinist.com
असामीजी, छान लेख वाचायला
असामीजी, छान लेख वाचायला सांगितलात. धन्यवाद.
प्रत्यक्ष देव प्रसन्न होऊन समोर उभा ठाकला तर त्याच्या चप्पलांची वादी कुठे तुटली आहे का, हेंच शोधत बसणार्या महाभागांना काय म्हणावे !!!!
बोर्ग अन नवरातिलोव्हा अॅड
बोर्ग अन नवरातिलोव्हा अॅड करावे का? >>>>>> इब्लिस जी तो सांघीक खेळ नव्हता .. महत्व सांघिक खेळामधे स्वतःचे वैशिष्टे उठवुन देणे होते...या अर्थाने मी लिहिलेले
<< महत्व सांघिक खेळामधे
<< महत्व सांघिक खेळामधे स्वतःचे वैशिष्टे उठवुन देणे होते.. >> आणि, शोकांतिका ही आहे कीं ध्यानचंदच्या युगानंतर बलबीर [ प. रेल्वे ] ते धनराज पिल्ले असे अनेक जागतिक किर्तिचे शैलीदार महान हॉकीपटू आपल्याच हॉकी खेळात पहायला मिळाले, तरीही सांघिक यशाअभावीं त्यांचीं नांवं मात्र अशा यादींत येऊं शकत नाहीत !
सचिन, सचिन आणि केवळ
सचिन, सचिन आणि केवळ सचिन!!!
असामी, मस्त आर्टिकल.
Pages