मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान

गाणी आणि गम्मत

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

माझ्या आठवणीतल्या दोन मजेशीर घटना ज्या दोन चांगल्या गाण्यांशी निगडीत आहेत.

प्रसंग एक -

ताई, ताई लली म्हणजे काय गं?
लली ... नाव असतं त्या कवितेत नाहीये का 'ललीने बोट लावलं... पिलूने बोट चावलं ' - इति मी
नाही गं ते नाही .. सीता वन वासा चा लली ........

प्रसंग दोन -

ऑफिसचं गेट टुगेदर

एक मध्यप्रदेशातला सहकारी पण होता मराठी बोलता व्यवस्थित येतं पण गाण्यातलं मराठी किंवा कविता असं नीट कळत नाही.

एका सरांनी छान मराठी गाणं म्हणलं "तोच चंद्रमा नभात"

गाणं झाल्यावर आमचा एमपीमधला कलिग म्हणला.

विषय: 
प्रकार: 

नविन क्रोशा स्वेटर...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नविन माझ्या पोतडीतून - माझ्या भाच्यासाठी - स्वेटर मिळाल्यापासून मुलगा तो घालूनच बसलाय काढायलाच तयार नाहीये -

Photo-0020.jpg

एका येऊ घातलेल्या बाळासाठी -

Photo-0038.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

कल्लोळ

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सकाळ .. हो तीच नेहेमीची सकाळ .सूर्य उगवल्यानंतरची. कुण्या मोठ्या माणसाने म्हणून ठेवलंय की.. ""There is nothing like morning, afternoon, night. I agree that we created these conventions for convenience but now they have become nothing but a barrier in our mindset." मोठी माणसं म्हणजे ...बरोबर तीच ती ... समाजमान्य यशस्वी.

विन्सेंट वॅन गॉग मोठा होता का? आणि यशस्वी? कि ठार वेडा होता? वेड्या लोकांवर लेख, पुस्तकं, कथा, कविता लिहीणारे लोक.. ते...? ते वेडे की शहाणे? असो.

प्रकार: 

नवीन क्रोशा बेबी ब्लँकेट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

Picture 003.jpg

जवळून असं दिसत आहे.

Picture 004.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आकाशकंदिल

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

बाबांनी आकाशकंदिल केलाय. शुभ दिपावली ! Happy

IMG_0707.jpg

विषय: 
प्रकार: 

क्रोशा - स्वेटर टोपी ब्लँकेट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हा पूर्ण सेट स्वेटर आणि टोपड्यासह -

IMG_0699.JPG

हे पूर्ण झालेलं ब्लँकेट असं दिस्तंय आता.

IMG_0690.JPG

----

सध्या दोन (लहान मुलांसाठी) ब्लँकेट / शॉल करायला घेतल्या आहेत आणि एक छोटा स्वेटर..

काम चालू असतानाचे हे फोटु

ब्लँकेट

IMG_0479.JPGIMG_0481.JPG

शाल आणि स्वेटर

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

हिरव्या हाताची हिरवी जादू

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुणाकुणाच्या हातात जादू असते तशी माझ्या बाबांच्या हातात जादू आहे असा माझा विश्वास आहे. त्यांच्या हाताने लावलेलं कुठलंही झाड लागतं, फुलतं, बहरतं. बाबांनी आता टेरेसवर भाज्या लावल्या आहेत दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी, हळद, पुदीना, अळू, घोसावळं...

तुमच्यासाठी बागेचे हे फोटो..

या फोटोत चार मोठे दूधी भोपळे आहेत ... तुम्हाला दिसताहेत का ?

Rakhi 057.JPG

कांदा - टोमॅटो. छोट्या चौकोनी भागात वांग / ढोबळी मिरचीची छोटी रोपं तयार करायची प्रक्रीया चालू आहे.

विषय: 
प्रकार: 

उणीव

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

किती सुरेख निसर्गचित्र आहे हे,
डोंगर, झरे, हिरवाई, निळंशार आकाश..
पण काही तरी कमी आहे यात,
नक्कीच काही तरी राहून गेलंय....
हे पुढचं चित्र सुंदर तरुणीचं,
सरळ तरतरीत नाक, लांबसडक बोटं, कुरळे केस..
पण इथेही तोच अनुभव..काही तरी कमी आहे
एक, दोन, तीन.... किती तरी चित्र पाहीली,
सगळीकडे तोच अनुभव.. अस्वस्थ करणारा
नक्की कसली उणीव आहे?
आता उमगलं... प्रत्येक चित्र निर्जीव..
प्राण उडून गेल्यासारखं
आता ही स्त्री...... इथेही ... ओह!
आरसा!

प्रकार: 

पॅकेज डील

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

प्रिय....,
तसं वागणारी ती तूच का?
आणि आज असं वागणारी ही पण तूच का?
असे प्रश्न 'तुला' का पडलेत?
या विषयावर आपण बोललो नव्हतो का?
आणि फार पूर्वीच मान्यही केलंय आपण..
'Every individual is a package deal'

प्रकार: 

निरोप

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ठीक आहे तर, आता आपल्या वाटा वेगळ्या
तू पूर्वेकडे जा, मी पश्चिमेकडे...
हो! चुकूनही भेट व्हायला नको पुन्हा...
आता मोठ्ठे झालोत ना आपण?
क्षणात कट्टी..क्षणात बट्टी करायला,
लहान का आहोत आता?
असं करु यात.. सीमारेषाच आखू यात,
हा भाग तुझा, तो भाग माझा..
वाटून घेऊ सगळं..
तू माझ्या भागात यायचा नाहीसच,
(आणि मला तुझ्या भागात यायची बंदीच आहे)
ए, पण तुला खरं सांगू का?
आपल्या दोघांमधलं नातं..
च्च! नातं म्हणलेलं चालेल ना?
अंऽऽ! किंवा असं म्हणू यात..
कुठलंही नातं, असं 'संपलं' म्हणून संपतं,
यावर माझा खरंच विश्वास नाहीये..
तू मला विचारलंच नाहीयेस म्हणा, असो.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान