मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान
डायरी..तीची-३
तिसरीत आल्यापासून मी आणि मोरे शाळेत बरोबर जातो. मोरे माझ्याच वर्गात आहे, जवळच राहते. मोरेचं घर पण एका खोलीचं आहे पण ती वेगळीच आहे. ती खूप हसते. दंगा करते. आज शाळा सुटल्यावर मी आणि मोरे येत होतो. तर एक माणूस गाडीवर लाल रंगाची फळं विकत होता.
कोकऽऽम..!
कोकम? म्हणजे काय ..? मी विचारलं
अगं मस्त फळ आहे, तू खाल्लं नाहीस कधी? मी गाडीकडे बघतबघत 'नाही' अशी मान डोलावली
पुढे आल्यावर "नीलम" च्या दुकानाशी मोरे एकदम खूप हसायला लागली ती नेहमीच अशी खूपच हसते. मी पहातच राहीले
काय झालं? का हसतेस उगीच?
तीनी तीचा हात माझ्यासमोर धरला हातातला रुमाल उलगडला आणि त्यात कोकऽऽऽम..
यंत्र
माझ्या आसपास आहेत माणसं..
छे! ही चालतीबोलती यंत्र
हसणारी, चालणारी, धावणारी, बसलेली..
स्वतःच्या प्रेमात स्वतःच फसलेली..
गल्लत करु नका..
फार फार वर्षापूर्वी याच ग्रहावर माणसं होती
अगदी, अगदी.. याच यंत्रांसारखी दिसणारी
चिडणारी, बोलणारी, लढणारी, जाणणारी..
पण ही यंत्र..नीट पहा या यंत्रांकडे..
वाट चुकलेल्या कोकरासारखी बावरलेली
जगण्याचं कारणच विसरलेली
प्रत्येक क्षण मनातून भेदरलेली
पण हुशार आहेत...
प्रत्येक गोष्टीचं तर्कशुद्ध समर्थन देण्याचं.
यांनाच जमलंय तंत्र
माझ्या आसपास आहेत माणसं..
डायरी..तीची-२
डायरी..तीची-१
१०२४ सदाशिव..
सहज
भयकथा - STY
या उसळणार्या रक्ताच्या..
एक सुगंधी, प्रसन्न सकाळ..
Pages
