या उसळणार्या रक्ताच्या..
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
20
या उसळणार्या रक्ताच्या नानाची टांग..
कळत कसं नाही याला 'इतकं' सुद्धा सांग?
तुरुंग सोडून शिबू, पप्पू बाहेर हे येणारच.
नव्यांसाठी तुरुंगात जागाही होणारच.
साला शिंपल लॉजिक, यात अवघड काय सांग?
या उसळणार्या रक्ताच्या..
इतक्या मोठ्या देशात, उपास कधी घडायचा..
म्हणून काय लोकांनी जीव उधळून द्यायचा?
जगण्यासाठी धडपडायला नको का? सांग..
या उसळणार्या रक्ताच्या..
बिहारमधे पुर आला, त्याला काय करणार?
पुरामधे वाहून जाऊन लोकही मरणार..
निसर्गापुढे माणसाचं कधी चाललंय सांग?
या उसळणार्या रक्ताच्या..
अन्यायाची याला सवय कशी होत नाही?
उसळण्याची याची सवय कशी जात नाही?
'त्यां'नी तरी अजून किती प्रयत्न करायचे सांग..
या उसळणार्या रक्ताच्या..
विषय:
प्रकार:
शेअर करा
शिंपल
शिंपल लॉजिक..
धन्यवाद.. ~~~~~
धन्यवाद..

~~~~~~~~~
~~~~~~~~~
(No subject)
खरच, कळत
खरच, कळत कसं नाही याला .....
मस्त
सुधीर
आवडली ...
आवडली ... विशेषतः 'या उसळणार्या रक्ताच्या नानाची टांग.'' ही ओळ !
तुझ्याकडून खूप उत्तमोत्तम लेखन होवो ह्या शुभेच्छा
संदीपला
संदीपला अनुमोदन.
***
If dreams are like movies, then memories are films about ghosts...
मस्त मीनू...
मस्त मीनू... छान आहे नानाची टांग
================
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!
कर्तृत्वश
कर्तृत्वशुन्यांचा नेभळटपणा नेमका टिपला आहेस!
मस्तच,
मस्तच, मीनू.
मीनू , खूप
मीनू , खूप मस्त !
एकदम झकास,
एकदम झकास,
मिनू
मिनू सुंदर.. तुला अनुमोदन...
मीनु मस्त
मीनु मस्त
आज्जे,गुड
आज्जे,गुड वन..
रक्ताच्या
रक्ताच्या नानाची टांग.. च्यामारी खरच ??

मस्तच!!
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.
नानाची
नानाची टांग ..... खरंय आणि बरंय
परागकण
वाह वाह
वाह वाह
छान!
छान!
छानच जमलीय
छानच जमलीय !
या
या उसळणार्या रक्ताच्या नानाची टांग -------
तर् मग उसळणार्या रक्ताच्या नानीची-------?
आ़जोड कल्पनाशक्ति,आणी शब्दानचि योग्य जुळ्वाजुळ्व यान्चि प्रचीती ओळ पुर्न करुन दयावी.