इंद्रधनुष्य
तुला कुणी सांगितलं होतं रे,
अंधार रेखाटायला...?
आणि इतर सगळ्यांना दिसला,
तसा..तुला तो काळाकुट्ट का नव्हता दिसला?
की सगळे रंग तुझ्या नजरेतच आले होते वस्तीला..?
तसंच असणार..
सगळं जगच रंगीत दिसत असणार मग तुला..
आणि तू स्वत: ?
तुझा रंग कोणता दिसला होता तुला?
आरशात इंद्रधनुष्य पाहिलेला,
तू एकटाच असशील.. हो ना?