चारोळी

असंच काही

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तो भेटून जातो..पेरुन जातो मनात माझ्या काहीबाही
कविताही अशी अचानक शून्यातून उगवत नाही...

प्रकार: 

रात्र

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पहिल्या ओळीत दहा शब्दाची अट आहे म्हणून हे वाक्य लिहित आहे. नेमस्तक, कृपया नोंद घ्यावी अशी विनंती.

दिवसाचे फुल कोमेजून
रात्रीची कळी उमलली;
मिटली निजेची पाकळी
चांदण्यांचे मोहर दरवळती

प्रकार: 

ओढ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

श्रावणातली हिरवी तिन्हीसांज
ऊन-पावसाचा खेळ विसरली
निरभ्र आकाशाला चांदण्यांची
फसवी ओढ देऊन गेली...

प्रकार: 

तळे...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कमळपत्रांनी झाकले तळे
त्यावर तृषार्त वैशाख ओघळे
माध्यान्हीचे उन्ह पिऊन
कमळकळी दव निथळे

प्रकार: 

अस लिहाव

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

लिहीणार्‍याने लिहीत जावे वाचणार्‍याने वाचत जावे.
अस लिहाव की जणू मनाच फूलपाखरू कागदावर उतरतय.
अस वाचाव की जणू कोणी शब्दांचे फूलच हूंगतय.
एक वेळ अशी येईल की फूल आणि फूलपाखरू एकच होउन जाईल.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - चारोळी