यंत्र
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
12
माझ्या आसपास आहेत माणसं..
छे! ही चालतीबोलती यंत्र
हसणारी, चालणारी, धावणारी, बसलेली..
स्वतःच्या प्रेमात स्वतःच फसलेली..
गल्लत करु नका..
फार फार वर्षापूर्वी याच ग्रहावर माणसं होती
अगदी, अगदी.. याच यंत्रांसारखी दिसणारी
चिडणारी, बोलणारी, लढणारी, जाणणारी..
पण ही यंत्र..नीट पहा या यंत्रांकडे..
वाट चुकलेल्या कोकरासारखी बावरलेली
जगण्याचं कारणच विसरलेली
प्रत्येक क्षण मनातून भेदरलेली
पण हुशार आहेत...
प्रत्येक गोष्टीचं तर्कशुद्ध समर्थन देण्याचं.
यांनाच जमलंय तंत्र
माझ्या आसपास आहेत माणसं..
छे! ही चालतीबोलती यंत्र
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
छान लिहिलंय मीनू....
छान लिहिलंय मीनू....
प्रत्येक क्षण मनातून भेदरलेली
पण हुशार आहेत...
प्रत्येक गोष्टीचं तर्कशुद्ध समर्थन देण्याचं.
यांनाच जमलंय तंत्र
अगदी अगदी... असलीच यंत्रं पसरलीत आजुबाजुला...
मीनू, फार दिवसांनी?
खरंय गं! शब्दात मस्त पकडलंस!
खरंय गं! शब्दात मस्त पकडलंस!
प्रत्येक गोष्टीचं तर्कशुद्ध
प्रत्येक गोष्टीचं तर्कशुद्ध समर्थन देण्याचं.
खरंय.
यांनाच जमलंय तंत्र>>
चांगली आहे कविता.
चांगली आहे कविता.
धन्यवाद तुम्हाला सर्वांना,
धन्यवाद तुम्हाला सर्वांना, कविता वाचून प्रतिक्रीया दिल्याबद्दल
(No subject)
वाट चुकलेल्या कोकरासारखी
वाट चुकलेल्या कोकरासारखी बावरलेली
जगण्याचं कारणच विसरलेली
प्रत्येक क्षण मनातून भेदरलेली
>>>> खूपच छान लिहिलं आहेस. भावलं.
या यन्त्रन्च्या दुनियेत
या यन्त्रन्च्या दुनियेत तुझ्या सारखि काहि मानस शिल्लक आहेत हेच आपल नाशिब
माझ्या आसपास आहेत माणसं.. छे!
माझ्या आसपास आहेत माणसं..

छे! ही चालतीबोलती यंत्र
माधवी,
खरंय !
कटु सत्य म्हणता येईल का ?
(No subject)