मैं तवायफ़ हूँ, मुजरा करुँगी
नगरवधू, देवदासी, तवायफ़ - काल आणि संस्कृती कोणतीही असो; वेगवेगळ्या नावानी या स्त्रिया समाजाचे (म्हणजे मुख्यतः पुरुषांचे) रंजन करत आल्या. या सगळ्या स्त्रियांचं खरं काम खरोखरच रंजन करणे इतकेच अपेक्षित होते, कारण या सगळ्या चित्रकला, नृत्य, गायन, काव्य, संभाषण या आणि अशा कलांचा अभ्यास असलेल्या. तेच त्यांचं उपजिविकेचं साधन. पण दुर्दैवाने त्यांचं नाव मात्र निगडित झालं ते समाजाने आणि परिस्थितीने त्यांच्यावर लादलेल्या दुसऱ्याच एका गोष्टीशी! त्यांच्यातले हे गुण जणू समाधान करायला अपुरे पडल्यासारखे त्यांच्यावर भलतेच काम लादले गेले आणि नगरवधू, देवदासी, तवायफ़ हे सगळे शब्द वेश्याव्यवसायाशी जोडले गेले.