काही दिवसांपूर्वी बहिणाबाईने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र 'चलो एक बार फिरसे वर..'लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. त्याची पार्श्वभुमी माहीत असणेही तितकेच अत्यावश्यक असते. अन्यथा लेखन संदर्भहीन , भरकटत जाण्याची शक्यता बळावते. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे.
“हल्लो सुमी का ? अगं मी बोलतेय, हेमा,
गडबडीत नाहीस ना? काही नाही ग, असाच फोन केला.”
“..........”
“ आईंच काय? बरं आहे म्हणायचं, सर्जरी होऊन ५ महिने झाले ग, अंथरुणात उठून बसतात आता, पण अजून चालता येत नाही त्यांना, सगळे अंथरुणातच आहे अजून.”
“.......”
“नाही ग, नॉर्मली १ महिन्यात पेशंट चालायला लागतो, पण आता यांचे वय, हेवी डायबेटीस वगैरे विचारात घेता सगळी गणितेच बदलतात.”
“........”
काही बोलायाचे आहे
गीतकार - कुसुमाग्रज
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही
कवी ग्रेसांच्या प्रतिभेला नमस्कार करून त्यांच्या अमर कवितेचे माझ्या द्रूष्टिकोणातून रसग्रहण, अर्थान्वयन करायचा प्रयत्न करते आहे. ह्यात फारसे गोड काही नाही पण जीवघेणे मात्र आहे. मला ही कविता ब्लॅक ह्युमर सारखी डार्क पोएट्री वाट्ते. गोड व लाडीक रस्त्यावरून दूर जाउन
एका खडतर मार्गावरून ही कविता आपल्याला फरपटत घेउन जाते. अंतःकरणात दाबून लपवून ठेवलेल्या भीती व एकटेपणाचा सामना करायला लावते त्याच वेळी त्या प्रत्यक्ष घटनेतले नाट्य व अंतिम सौंदर्य पण अधोरेखित करते.
मर्म भेदणे म्हणजे एखाद्याच्या मर्मस्थानावर अचूक वार करून ते विदीर्ण करणे. अर्थात प्रत्येकाची मर्मस्थाने वेगळी असू शकतात. कोणाचे मर्म त्याची अत्यंत प्रिय व्यक्ती असू शकते, कोणाचे मर्म कुळाचे मोठेपण तर कोणाचे अजून काही. पण एखाद्याचा स्वतःबद्दलचा अभिमान हेच मर्मस्थान असेल तर? ते भेदल्यावर तो माणूस जिवंतपणीच मृत्यूयातना भोगेल. त्याचे मूल्य त्याच्या नजरेतही शून्य होईल. अशा माणसाला प्रत्यक्ष ठार करण्यापेक्षाही जास्त भयंकर काय असेल तर तो त्याचा मर्मभेद!
मला आवडलेले पुस्तक - भाग १ - पोखिला
पोखिला - अपहरणाचे ८१ दिवस
लेखक - डॉ . विलास बर्डेकर
नावापासूनच हे पुस्तक आपल्या मनाची पकड घ्यायला लागते . डॉ . विलास बर्डेकर यांच्या जीवनात
घडलेल्या त्या चित्त थरारक ८१ दिवसांची ही अनुभव मालिका .
फुलपाखरांच्या शोधात अरुणाचल प्रदेशाच्या जंगलात गेलेल्या या संशोधकाला बोडो दहशतवादी,
पत्रकार समजून चुकून पकडतात . त्यांचे अपहरण करतात . आणि तब्बल ८१ दिवस डॉ विलास यांना
या दहशत वाद्यांच्या ताब्यात राहावे लागते .
तेव्हाचे सर्व अनुभव अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत . जरी त्यांना तिथे ओलिस
बहिणाईची गाणी …
आमच्या लायब्ररीत मी एका वेगळ्याच पुस्तकाच्या शोधात गेले होते. पण तिथे अचानक प्र. के. अत्रे संपादित "बहिणाईची गाणी" हे पुस्तक हाताला लागले . अलीबाबाच्या गुहेतला सारा खजिना मिळाल्यासारखा आनंद मला त्यादिवशी झाला
.
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येत पिकावर
कविवर्य भा.रा. तांबे यांच्या एका काव्यसंग्रहातील 'घन तमी शुक्र बघ राज्य करी' हे स्वरांचे प्रचंड चढउतार असलेलं गाणं लतादीदींचं फार प्रिय आहे. हे गाणे लतादीदींचे प्रिय असण्यामागे अजून एक महत्वाचे कारण आहे. दीदी पं. दीनानाथांबरोबरच आणखी दोन व्यक्तींना गुरू मानतात. एक भालजी पेंढारकर आणि दुसरे मास्टर विनायक. मास्टर विनायकांबद्दल दीदी खुप आदराने बोलतात...
त्या सांगतात....
एक जिज्ञासा :
अभिप्राय, रसग्रहण आणि समीक्षण
यामध्ये नेमका फ़रक काय असतो? या तिन्ही प्रकारातील सिमारेषा मला नीट लक्षात येत नाही आहे.
चर्चा अपेक्षित आहे.