Attached for your reading pleasure is an article from my Marathi eBook
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=280721062030&P...
ग्रेस
मुळात ग्रेस म्हणजे एक मोठे गारुड आहे. एखाद्या आरसे महालात गेल्यावर एकाच व्यक्तीच्या प्रतिमा वेगवेगळ्या कोनांतून दिसाव्यात की प्रत्येक प्रतिमेचा भिन्न भिन्न भास व्हावा, आपल्याच मनाला भुरळ पडावी की खरी प्रतिमा सुंदर की ती व्यक्ती? असेच काहीसे घडते पुष्कळदा. आठवणींना अंत नाही हेच खरे.
माझे प्रेरणा स्त्रोत असलेले महाकवी ग्रेसना ही कविता समर्पित.
अथांग साहित्याच्या सागरात
एक माणिक खास चमकून गेला
आपल्या शैलीशी तडजोड न करणारा
एक महाकवी असाही होऊन गेला
अर्थाचे जाळे त्याला शब्दांची किनार
त्याचे काव्य जणू विश्वाचा आकार
गहन अन् गंभीर विषयाला गुढतेचे वलय
कवी ग्रेस म्हणजे कोणी साधा कवी नव्हे
एक एक शब्द जणू परका वाटावा
अगदी विद्वाना देखील अर्थ न लागावा
असेच आहे काहीसे ग्रेस चे साहित्य
वाचकांना मंत्रमुग्ध करणारी भाषेची किमया
- अक्षय समेळ.
कवी ग्रेसांच्या प्रतिभेला नमस्कार करून त्यांच्या अमर कवितेचे माझ्या द्रूष्टिकोणातून रसग्रहण, अर्थान्वयन करायचा प्रयत्न करते आहे. ह्यात फारसे गोड काही नाही पण जीवघेणे मात्र आहे. मला ही कविता ब्लॅक ह्युमर सारखी डार्क पोएट्री वाट्ते. गोड व लाडीक रस्त्यावरून दूर जाउन
एका खडतर मार्गावरून ही कविता आपल्याला फरपटत घेउन जाते. अंतःकरणात दाबून लपवून ठेवलेल्या भीती व एकटेपणाचा सामना करायला लावते त्याच वेळी त्या प्रत्यक्ष घटनेतले नाट्य व अंतिम सौंदर्य पण अधोरेखित करते.