आश्वस्त

चरैवेति, चरैवेति

Submitted by पुरंदरे शशांक on 21 October, 2019 - 01:21

चरैवेति, चरैवेति

नाहीच येथ कोणी उत्साह वाढवाया
कोणी न दे प्रशस्ति ना वाहवा कराया

चालायचीच वाट माझीच एकट्याला
चुकली जरी कधी ती कोणी न सावराया

टिकवावयास धैर्या माझाच मीच साथी
विश्वास आणि श्रद्धा हातात हात द्याया

हा मार्ग वेगळाचि नाही खुणा पथीच्या
चालून कोणी गेले ना ठेविती सहाय्या

ह्रदयात एक उर्मी फुलवोनी कोणी गेला
मार्गी दिसे कधी तो आश्वस्त मज कराया

तो भासमान आहे, सत्यात उतरलेला
ठाऊक नाही तरीही बळ देई चालण्या या

मार्गी थकून जाता नव्हताच काही थारा
खांद्यावरी हाताचा आभास फक्त वाया

Subscribe to RSS - आश्वस्त