काय देवा कसा आहेस?

Submitted by शोनु-कुकु on 15 April, 2013 - 08:51

"पहिल्यांदाच लिहिलय , कृपया समजून घ्या. माझा आणि लेखनाचा तसा संबंध कमीच.."

देव आहे कि नाही या प्रश्नावरून वाद आहे पण कदाचित ज्या शक्तीवर हे निसर्ग चक्र सुरु आहे त्या शक्तीला देव हे नाव दिले गेले असेल .माझा मुद्दा देव आहे कि नाही हा नाहीये . त्यामुळे तो विषय राहू देत .
आज ऑफिसमध्ये बसले होते आणि नेहमीप्रमाणे खुर्ची मधून उठता उठता बोलले .."अरे देवा "..जस कि आपण "अग आई ग " पण म्हणतो तसच ..
आणि पटकन विचार आला मनात ,आपण ज्याचे उठता बसत नामस्मरण करतो ..हात जोडतो , नमस्कार करतो , त्याला सगळ्याचं कल्याण कर अस सांगतो त्याची काही दु:ख असतील का ? कि देवाच काम फक़्त आपली गार्हाणी ऐकण्याच आहे ..जगातील कितीतरी लोक रोज देवापुढे आपले गाऱ्हाणे मांडत असतील ..
देवाला आपण गृहीत धरतोय अस वाटायला लागलाय मला .काही वाईट झाल " देवाची इच्छा काय करणार ? "..काही छान झाल " देवाची कृपा "… काहीही झाल तरी सगळ्याला कारणीभूत देवच का ?..
तसं पाहिलं तर माणूसच निर्णय घेतो , माणूसच चुका करतो आणि त्याचे परिणाम पण तोच पाहतो मग देवाला का मध्ये ओढतो आपण ?
आपण रोज दिसणाऱ्या माणसाला विचारतो “कशे आहात /कस चाललय तुमच ..बर आहे ना? तब्येत काय म्हणतेय ? “ पण ज्या देवाला आपण एवढा जबाबदार बनवलं आहे त्याला नसेल का वाटत मला कोणीतरी विच्रावा कि “हे देवा तू कसा आहेस ..तुझ कस चाललय,तब्येत कशी आहे ”
मला माहित आहे कि हे जर विचित्र वाटतंय ऐकायला पण जे वाटल ते लिहितेय
आपण कदाचित विचार करू देवाला कसलं आलाय दु:ख ,सगळ तर तोच करतो ..सगळ तर त्याच्याच हातात आहे मग देवाला कसली आलीये काळजी आणि दु:ख
पण कदाचित जर आपण एक दिवस ठरवलं आज आपण देवाला विचारायचं कि तू कसा आहेस आणि आज देवाचच बोलण ऐकायचं तर कदाचित आपल्याला काहीतरी वेगळच ऐकायला मिळेल जगात कुठे काय आणि का सुरु आहे याबाबत .मी विचार करू लागले कि काय असतील देवाच्या अपेक्षा आणि काय सांगेल देव … माणसाने कशी धरणी मातीची अवहेलना सुरु ठेवली आहे , वृक्ष तोड , पाणी प्रदूषण ,हवा प्रदूषण , ध्वनी प्रदूषण आणि खूप काही यावरच बोलेल कि जाती जमाती ,धर्म ,रंग ,प्रांताबद्दल बोलेल ..
असं असेल का देवाच म्हणन?
कदाचित देव म्हणेल " मी बरा आहे ..जगाच्या काही भागात माझ्या लेकरांची अवस्था दयनीय आहे या दुष्काळामुळे ..जी मला पाहवत नाहीये ..आणि यात मी काही करू शकणार नाही . मी फक़्त पाहत असतो .चमत्कार वगैरे काही नाही हो करता येत मला .मला समजून घ्या .मला गृहीत धरू नका .खूप बोलायचं आहे पण मला कोणी काही विचारातच नाही जो तो आपल्या व्यथा मांडण्यातच व्यस्त आहे माझ्यापुढे ..
माझी तब्येत बरी आहे असाच म्हणव लागेल पण खालावत चालली आहे , कारण निसर्गाचा समतोल ढासळतोय म्हणजेच माझी तब्येत खालावतीये
आज भारताच्या ज्या भागात जो काही दुष्काळ आहे त्याला हि मीच जबाबदार ठरतो ..पण हे परिणाम तुम्हीच केलेल्या कृत्यांचे आहेत हे नाही कोणी लक्षात घेत ..
औद्यागीकरण , बदल हि काळाची गरज आहे .तुम्ही बदल पण निसर्गाचा समतोल ढासळून देऊ नका .
मलाही वाटत कि माणसाने निसर्गाचा आदर करावा , जर माणसाने निसर्गाला भरभरून दिल तर निसर्ग माणसाला भरभरून देईल .साधं सोप गणित कळत नाहीये .
मनुष्य प्राणी माझ्या पूजेसाठी लाखो खर्च करतात पण त्याच मंदिरांच्या दारावर बसलेल्या भिकाऱ्याला मात्र दुर्लक्षित करतात मला याची काहीच गरज नाहीये कारण मी असा मंदिरात दर बंद करून नाही राहत .
माझी पूजा अर्चा ,उपास तपास करून मी प्रसन्न वगैर होत नसतो ..जर तुम्ही माणसाला माणसासारख वागवलत , माणुसकीने वागलात , गरिबाला सढळ हाताने मदत केलीत , दारात आलेल्या उपाशी माणसाला पोटभर खायला घातलत, तर तीच खरी पूजा माझी .
माझ्यासाठी जे लोक करोडो खर्च करतात त्या ऐवजी जर त्यांनी लोकांसाठी रोजगार उपलब्ध केला तर किती तरी लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल .
मलाही वाटत कि सगळे लोक सुखी असावेत पण ते मी नाही करू शकत
मनुष्य प्राण्याच मलाच हसू येत जगात सगळ्यात जास्त बुद्धी असलेला प्राणी पण कधी कधी विचार मात्र फार कमी करतो . जरा काही त्रास व्हायला लागला कि हा माणूस उपास तपास , हि शांती ती शांती करत वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करतो आणि त्याचा उपयोग मात्र काहीच नाही हे जगात सगळीकडे होते असाही नाही पण जिथे होते तिथे हातात काहीच पडत नाही ..हे मनुष्य प्राण्या जागा हो …जरा विचार कर आणि त्या गोष्टीच मूळ कारण शोधायचा प्रयत्न कर ..श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको .
माझी पूजा पाठ , देव धर्म करण्यात वेळ घालवण्यापेक्षा हे मानवा तुझी कंबर कस ,कष्ट कर , यश तर तुझंच आहे .काही माणस आज इतकी यशस्वी का आहेत ..याचा विचार कर ..जे स्वतावर विश्वास ठेवतात तेच यशस्वी होतात. म्हणूनच आज देव सांगतोय देवापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग पहा कसे चमत्कार होतील ते. नवस करून यश मिळत नसत हे लक्षात ठेवा ..
मनुष्य प्राण्याने केलेली प्रगती पहा ..माणसाला उडता येत नाही पण विमानाचा शोध माणसाने लावला आणि त्याच्याच इच्छा शक्तीने माणसाला पंख दिले. ते करण्यासाठी मी काहीही मदत केली नाही. निसर्गाकडून मिळालेल्या बुद्धीचा वापर करून तुम्ही जगाचा चेहरा बदलला ...
मी नाही पाहिलं कि Bill Gates, Steve Jobs , Einstine Mother Teresa सारखी माणस माझ्यापुढे त्याचं दु:ख मांडत बसलीत .ते त्यांच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिले , सगळ विसरून काम केल आणि आज त्यांची कीर्ती महान आहे . आणि त्यांच्या कामाचा फायदा आज जगातील प्रत्येक माणसाला होतोय .
.मी अस म्हणत नाही कि पूजा अर्चा करू नका ..जर तुम्हाला ते करून मानसिक समाधान मिळत असेल तर करा पण ती केल्यावरच माझी कृपा तुमच्यावर राहील असा विचार करत असाल तर ते डोक्यातून काढून टाका …मी रोज पूजा करतो म्हणजे माझ काही वाईट होणार नाही अस गृहीत धरू नका.
जो प्रामाणिकपणे कष्ट करेल यश त्याच असेल ..त्यात मी काहीही करू शकत नाही.
आज या सुंदर निसर्गाचा जो ऱ्हास सुरु आहे तो पाहिल्यावर माझ काळीज तीळ तीळ तुटतंय.
माणसानेच तयार केलेली उक्ती आहे ना कि देव चराचरात आहे ..मग मी जर चराचरात आहे तर माझे हाल सुरु आहेत ते दिसत नाहीत का ?निसर्गाचा समतोल ढासळतोय तो दिसत नाही का ?जेव्हा एखादा वृक्ष तोडायचा निर्णय घेता तेव्हा वाटत नाही का तुम्हाला कि तो घाव माझ्यावर ,तुमच्या देवावर पडतोय .
या निसर्गातील कितीतरी सजीव कायमचे संपुष्टात आलेत आणि काही येण्याच्या मार्गावर आहेत .निसर्ग चक्र जर बिघडलं तर मानवाचं अस्तित्व धोक्यात येईल हे तुम्हाला आज देवाने सांगायची वेळ यावी यापेक्षा मोठ दु:ख माझ्यासाठी काय असेल .पहातोय स्वताच्या डोळ्याने या पृथ्वीचा हळू हळू होणारा नाश. माणसाने माणसाला आणि निसर्गाला तारल तरच या पृथ्वीवर स्वर्ग नांदेल. जोपर्यंत माणूस स्वत: स्वत:ची मदत करत नाही तोपाराय्नात देव काहीच करु शकत नाही ”
खरच हे सांगायचं असेल का देवाला कि आपण आपले देवाच्या भीतीने पूजा पाठ सुरु ठेवायचे आणि पाहत बसायचं काही चमत्कार होतोय का देव दयेने ते ?

शोनु-कुकु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणूसच निर्णय घेतो , माणूसच चुका करतो आणि त्याचे परिणाम पण तोच पाहतो मग देवाला का मध्ये ओढतो आपण ?
हे सर्वांना माहित आहे, पण अभिमानी लोकांना स्वतःचा मूर्खपणा कबूल करवत नाही. मग म्हणायचे देवाची इच्छा, देवाच्या मनात नव्हते.
आणि कुठे थोडे जरी यश, चुकून का होईना, मिळाले की म्हणायचे पहा मी किती हुषार!

जोपर्यंत माणूस स्वत: स्वत:ची मदत करत नाही तोपाराय्नात देव काहीच करु शकत नाही ”
भारतीयांना स्वतःच काही करायला पाहिजे असे नाही. इंग्रजांनी रेल्वे, पोस्ट याच्या कल्पना भारतात आणून, भारतीयांना लाथा घालून ते करून घेतले. आता भारतीय म्हणतात - आम्हीच केले.
अमेरिकेत फोन, काँप्युटर नि अनेक शोध लागले, भारतीयांनी घेतले. म्हणजे काय, स्वतः काही न करता, इतर माणसेच करतील ते उचलले की झाले. देव कशाला पाहिजे मधे.

तेंव्हा भारतात तरी आपण पूजा पाठ सुरु ठेवायचे . बॉलीवूड, क्रिकेट आहेच वेळ घालवायला. काही नवीन इतर कुणी केले की ते आपण घ्यायचे.