तानसेन बद्दल बर्याच कथा प्रचलित आहेत.
त्याने दीप राग गाइला तेव्हा तो इतका सुंदर आणि प्रभावी होता कि दरबारातल्या दीपकाचे ज्योत त्या प्रभावा मुळे प्र्ज्वलित झाली . मंत्रमुग्ध श्रोते अवाक झाले .
तानसेनला पाण्यात पहाणारेही दरबारात होते. त्यातल्या एकाने या गोश्टीचा फायदा घेऊन तानसेनचा दबदबा कमी करण्याचा कट आखला. अकबराच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या वयाच्या संख्येइतके दिवे दरबारात पेटविण्याचे आव्हान तानसेनने स्वीकारावे असा प्रस्ताव त्याने मांडला.
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही. अनेक वर्षांनंतर ते गाणं बसंत-बहार चित्रपटामधील असून त्यात तानसेन नाहीच हे कळल्यावर मी खजील झालो होतो.