तानसेन बद्दल बर्याच कथा प्रचलित आहेत.
त्याने दीप राग गाइला तेव्हा तो इतका सुंदर आणि प्रभावी होता कि दरबारातल्या दीपकाचे ज्योत त्या प्रभावा मुळे प्र्ज्वलित झाली . मंत्रमुग्ध श्रोते अवाक झाले .
तानसेनला पाण्यात पहाणारेही दरबारात होते. त्यातल्या एकाने या गोश्टीचा फायदा घेऊन तानसेनचा दबदबा कमी करण्याचा कट आखला. अकबराच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या वयाच्या संख्येइतके दिवे दरबारात पेटविण्याचे आव्हान तानसेनने स्वीकारावे असा प्रस्ताव त्याने मांडला.
दीप राग गाताना तानसेन इतका समरसून गात होता कि त्याचा परिणाम स्वरूप त्याच्या शरीरात प्रचंड ऊष्णता निर्माण झाली आणि त्यामुळे होणारा दाह खूप काळ त्याला जाळत राहिला होता म्हणून मग तो मल्हार गाऊ लागला तेव्हा त्याचा दाह शमला.
आता इतके दीप प्रज्वलित करणे हे या पार्श्वभूमीवर मोठेच अवघड काम होते. मग त्याने एक युक्ती केली. त्याने असे ठरविले कि प्रत्येक दीप प्रज्वलित झाल्यावर दुसर्या दालनात जायचे जिथे कोणीतरी मल्हार गात असेल. दाह शमला कि पुढचा दिवा लावायला तो तयार.
इतके प्रभावी गायन करू शकेल असा गायक फक्त कोणी असेल तर तो गुरू बंधूच ! तो गुरू हरिदासांकडे गेला. गुरूनी त्याच्याबरोबर एक शिष्या पाठवली.
दरबारात ठरल्याप्रमाणे बैठक जमली . तानसेन दीप प्रज्वलित करत गेला आणि शिष्या मल्हार गाऊन त्याला शांत करत राहिली.
अर्थातच तानसेनचा दबदबा आबादित राहिला.
तानसेनच्या कथा १
Submitted by पशुपत on 5 June, 2020 - 08:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
छान
छान
छान
छान
कोण होती ती शिष्या ?
कोण होती ती शिष्या ?
अप्रतिम लेखन कौशल्य ..!!
अप्रतिम लेखन कौशल्य ..!!