Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी काल सचिन पिळगावकर आणि
मी काल सचिन पिळगावकर आणि शिल्पा तुळसकर यांचा गजेंद्र अहिरे लिखित दिग्दर्शित एक चित्रपट पाहिला . नाव लक्षात नाही मात्र अभिनय सुंदर होता .
सोहळा?
सोहळा?
अगदी बरोबर . खूप लांबवला आहे
अगदी बरोबर . खूप लांबवला आहे मात्र .
काल कुठल्यातरी चॅनेलवर लागला
काल कुठल्यातरी चॅनेलवर लागला होता सोहळा पण मी सचिन बरोबर शिल्पा तुळसकरला बघितलं. इरावतीपण आहे का. सोनी चॅनेलवर गुरुवारी रात्री अकरा वाजता मराठी चित्रपट दाखवतात. आता टेक केअर गुड नाईट लावलाय. मागच्या गुरुवारी बालगंधर्व, त्याआधी आपला मानूस बघितला. आपला मानूस काही खास नाही वाटला, त्यापेक्षा नाटक जास्त प्रभावी होते.
चंपा . इरावती नाही शिल्पा आहे
चंपा . इरावती नाही शिल्पा आहे माझी नावात गडबड झाली होती .
कोको हॉरर आहे ना ?????
कोको हॉरर आहे ना ?????
कोको (इंग्रजी) लहान मुलांचा
कोको (इंग्रजी) लहान मुलांचा सुंदर चित्रपट आहे
कोको all time favourite अहे.
कोको all time favourite अहे. मेक्सिको मधल्या सर्वपित्री अमावास्येवर आधारित आहे.
कोको हॉरर आहे ना ?????>>>
कोको हॉरर आहे ना ?????>>> खोपडीचे चित्रे आहेत पण भयपट नाही आहे.
बघतो वीकएंड....
बघतो वीकएंड....
कोको माझापण बघायचा राहीलाय.
कोको माझापण बघायचा राहीलाय. बघतो आता वेळ मिळालाय तर. अटँक्स आँफ टायटन पण बघु म्हणता म्हाणता राहुनच गेलाय.
अनवट पहिला काल....
अनवट पहिला काल....
कोकणातील अंगावर येणारा पाऊस आणि गुढ़ गर्द वातावरण सोडले तर मूवी बकवास आहे....
आता हायवे बघितला झी टॉकीजवर.
आता हायवे बघितला झी टॉकीजवर. आर्ट मूवी सारखा आहे. जेव्हडं ऐकलं होतं त्यामानाने काही खास वाटला नाही. टिस्का चोप्राची काय गोष्ट होती काहीच कळली नाही. मुक्ता एका मुलीशी फोनवर बोलत असते की आपण लग्न करूया, मला लहान मुलांची खूप आवड आहे. काही संवाद कान देऊन ऐकावे लागतात ईतके हळू आवाजात बोलतात आणि मधेच जोरात पार्श्वसंगीत वाजते. आजकाल हाइप असलेले चित्रपट रात्री उशिरा लावतात, दिवसा तेच तेच जुने पाने, अनोळखी कलाकार असलेले.
T.c.g.n. चांगलाय. फक्त शेवटी
T.c.g.n. चांगलाय. फक्त शेवटी सचिन खेडेकर विचारतो 'म्हणजे तो तुमचा मुलगा होता का?' तेव्हा महेश मांजरेकर 'आता नाही ' असं काय बोलला कळलं नाही.
मराठी चित्रपटाविषयी चर्चा
मराठी चित्रपटाविषयी चर्चा करण्यासाठी दुसरा धागा काढला आहे.. तेव्हा कृपया मराठी चित्रपटाबद्दल तिथे लिहा ही विनंती.. कारण मला मराठी चित्रपट पाहायला फार आवडतात.. आणि या नेहमीच्या चित्रपट धाग्यात मराठी, हिंदी अशी सरमिसळ होते त्यामुळे reviews जाणून घ्यायला खूप शोधाशोध करावी लागते.. तेव्हा मराठी चित्रपटाविषयी त्या धाग्यावर लिहावं ही विनंती..
हॉटस्टार वर काल "कानपुरिया"
हॉटस्टार वर काल "कानपुरिया" बघितला थोडा वेळ. सुरूवात चांगली वाटली. मग मधे जोक्स जरा मराठी विनोदी पिक्चर्स मधे असतात तसे पकावू झाल्यावर बंद केला.
आज भाई पहिला
आज भाई पहिला
चांगला वाटला...घरच्यांना तर फार आवडला
मला सुनीता ताईंच्या लेखनाबद्दल एकही उल्लेख वा प्रसंग नसणे खटकलेच जरा...
खास करून बाबा आमटे, आनंदवन भेटीवर एक मोठा भाग चित्रित झालाय...तो बघताना सुनीता ताईंचा शाळेतला पाठ आठवला ताडोबा भेटीचा
भाई कुठे पाहिला????!
भाई कुठे पाहिला????!
प्राईमवर आहे बहुतेक.
प्राईमवर आहे बहुतेक.
नाही भाई प्राईम आणि नेफ्लि
नाही भाई प्राईम आणि नेफ्लि दोन्हीवर नाहीये. तुम्ही कुठे पहिला??
भाईचे दोन्ही भाग यूट्यूबवर
भाईचे दोन्ही भाग यूट्यूबवर आहेत.
किंबलांगी नाईट्स प्राईमवर बघितला. चांगला आहे मल्याळी चित्रपट. केरळ मला अतिशय आवडते. जे केरळमध्ये राहतात ते कधी कुठल्या दुसऱ्या हिल स्टेशनला जात नसतील. त्यातली एक मुलगी मला अगदी मिथिला पालकरसारखी वाटली.
भाईचे दोन्ही भाग यूट्यूबवर
भाईचे दोन्ही भाग यूट्यूबवर आहेत. >> धन्यवाद चंपा
हो मला यूट्यूब वरचं मिळाला
हो मला यूट्यूब वरचं मिळाला
डॉ. प्रकाश आमटे झी टॉकीज वर
डॉ. प्रकाश आमटे झी टॉकीज वर पुन्हा पहिला आणि पुन्हा आवडला.
काही प्रसंग धम्माल आणतात.
जसे की पहिला आदिवासी रुग्ण (बरा झाल्यावर) अचानक पहाटे उठून आपली कॉट घेऊन आश्रमाबाहेर जाऊ लागतो तो...
आपलं बाळ लवकर बर व्हावं म्हणून संपूर्ण बाटली एका वेळी देणारी आई...
मोतीबिंदू बरा झाल्यानंतर पटशी ओळखणारी आजी...
फॉरेस्ट ऑफिसर ने लिहिलेलं डिअर चं स्पेलिंग आणि त्यावरचं स्पष्टीकरण...
असे अनेक
पुरू मोठा झाल्यावर अमेरिकेत झालेली भेट, पद्मश्री परत करण्याचा डॉक्टरांचा निर्णय... हे प्रसंग हेलावून जातात...
योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी ओ एम जी ये मेरा इंडिया मध्ये त्यांच्यावरच एक भाग होता... छान वाटलं खूप
खरं म्हणजे कधी एकदा एक जून
खरं म्हणजे कधी एकदा एक जून येतोय असं झालंय.
अर्थात थोडी कळ अजून अजून सोसायची आहे.
आज प्राईम वर अचानक ‘कॅच मी इफ यू कॅन’ पाहिला आणि मरगळ दूर झाली. खूप आवडला.
सत्य घटनेवर आधारित आहे.
दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग आणि प्रमुख भूमिका Leonardo DC & Tom Hanks .
1987 मध्ये आलेला गवाही माझ्या
1989 मध्ये आलेला गवाही माझ्या लक्षात राहीला तो त्यातल्या सुंदर गाण्यांमुळे. अनुराधा व पंकज उदासने गायलेली यातली चारही गाणी तेव्हा प्रचंड गाजलेली. इतकी प्रचंड की या चित्रपटाच्या निर्मात्या सुपर कॅसेट्सला अनुराधा व पंकज उदासला घेऊन आशियाना हा गझलांचा दोन भागातील अल्बम काढायची उर्मी आली आणि तो अल्बमही खूप गाजला. मी गवाही व आशियानाची खूपच मोठी फॅन होते, आजही आहे. ( अल्बम आजच्या काळात आला असता तर सोशल मीडियावर लोकांनी संबंधितांना झोडून काढले असते तेव्हाही खूप टीका झालेली, ढापलेल्या गाण्यांवर आणि अनुराधावर.... )
असो. गाण्यांमुळे गवाही लक्षात राहीला. परदेशी कथेवर आधारित आहे असे वाचले होते...चित्रपट बहुतेक साफ झोपलेला... कारण मला यु ट्यूबवर खूप वेळा शोधूनही सापडला नव्हता. पहायची उत्सुकता होती. यातला आशुतोष गोवारीकर व झीनतचा एक शॉट कुठेतरी पाहिलेला. तेवढेच आठवत होते.
काल सहज आठवण आली, यु ट्यूबवर परत शोधले आणि हा चित्रपट कोणीतरी हल्लीच अपलोड केलेला आढळला. लगे हाथ बघून घेतला... हाय रे दैवा.... कथानकात रहस्य आहे पण ते धक्का बसेल अशा तऱ्हेने सादर करण्यात दिग्दर्शक पूर्णपणे अयशस्वी झालाय. चित्रपटात पटण्यासारखे काहीही नाही. प्रचंड चुकीची कास्टिंग. झीनतच्या डोळ्यामुळे ती विचित्र दिसते, कॅसनोव्हा म्हणून शेखर कपूर अजिबात शोभत नाही. सगळ्या पात्रांचे वय तोंडावर दिसते. रणजित चौधरी असा न तसा म्हणून तोंड फाटेपर्यंत ज्या पात्राची स्तुती केली जाते ते पात्र प्रत्यक्ष दिसते तेव्हा अगदीच 'पात्र' दिसायला लागले तर कसे होईल?? आणि भारतातून किंवा मुंबईतून हॉंगकॉंगला पळून जायला बारकुंडी मोटार बोट वापरायची?
असो, एक उत्सुकता शमली, बदल्यात निराशा पदरी पडली. चार गाणी गाजली होती त्यातली फक्त दोनच गाणी पडद्यावर दिसतात, तीही नसती तरी चालले असते. ज्या एका गाण्यात पडद्यावर लिपसिंकिंग केलेय त्यात पात्रे अवघडल्यासारखी गातात....
कोणाला गाण्यांबद्दल उत्सुकता असेल तर इथे बघा...
https://youtu.be/WcaeUGklZPg
https://youtu.be/TJWNwG9t4dg
https://youtu.be/0QJ-8xNTufs
https://youtu.be/yzFXf9eygYQ
अमॅझॉन प्राइमवर 'पॅरासाइट'
अमॅझॉन प्राइमवर 'पॅरासाइट' पाहिला.
एकदम ऑफ-बीट ट्रीटमेंट, जबरदस्त सिनेमा आहे.
'उकीरड्यावर फिरणारी झुरळं' हे रुपक ज्या प्रकारे पडद्यावर दिसतं, ते फार अंगावर येणारं आहे. तो संपूर्ण सिक्वेन्स फार हॉटिंग आहे, ४ दिवस झाले, अजून डोक्यातून जात नाही.
वक्रोक्तीपूर्ण, व्यंगोक्तीपूर्ण, ब्लॅक कॉमेडीच्या जवळ जाणारं कथानक.
पॅरासाइट कुटुंबातली तरुण मुलगी, दिसायला अत्यंत गोड, पण तिचे २-३ सीन्स, क्लोज-अप्स असे आहेत की तिचं भ्या वाटायला लागतं. कथानकात पुढे तिचं जे काही होतं ते तसं का हे सिनेमा संपल्यावर खूप वेळाने जाणवतं.
वेगळं काही बघायला आवडत असेल तर मुळीच चुकवू नये असा सिनेमा.
अगदी ललिता, सुन्न व्हायला
अगदी ललिता, सुन्न व्हायला होतं हा सिनेमा पाहून. जबरदस्त सिनेमा.
समांतर पुढे कधी ?
समांतर पुढे कधी ?
कथानकात पुढे तिचं जे काही
कथानकात पुढे तिचं जे काही होतं ते तसं का हे सिनेमा संपल्यावर खूप वेळाने जाणवतं.>>म्हणजे जरा उलगडून सांगाल का? मी बघितलाय पण हे काही जाणवलं नाही. नक्की काय मिसलं?
Pages